नवजात शिशुंमधील निओनेटल रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमचे प्रगत उपचारांद्वारे व्यवस्थापन शक्य

26 Nov 2023 17:00:03
  • अकाली जन्मलेल्या बाळांचे आरोग्य आणि त्याचे व्यवस्थापनावर विशेष चर्चा : राष्ट्रीय निओनॅटोलॉजी फोरम (NEOCON) 2023 चे वार्षिक संम्मेलन
neonatal-respiratory-distress-syndrome-management - Abhijeet Bharat 
नागपूर : अकाली जन्मणाऱ्या बाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जागतिक स्तरावर, दरवर्षी 15 दशलक्ष मुदतपूर्व बाळ जन्माला येतात, त्यापैकी 25 टक्के अकाली जन्माणारी बाळं ही भारतात आढळून येतात. मुदतपूर्व प्रसुतीमध्ये नवजात शिशुंना श्वसनाचा त्रास (श्वास घेण्यात अडचण) होण्याचा धोका अधिक असतो. नुकतेच नागपूर येथे राष्ट्रीय निओनॅटोलॉजी फोरम (NEOCON) 2023 च्या 42 व्या वार्षिक संम्मेलन पार पडले. या संम्मेलनाची यंदाची संकल्पनी ही प्रत्येक नवजात शिशु - जगवा आणि वाढवा यावर आधारीत असून याठिकाणी आयोजित सत्रांमध्ये नवजात शिशुंमधील विकास, नवजात मुलांमधील आजारांचे निदान आणि उपचार या विषयांवर चर्चा करण्यात आली. नवजात मृत्यूचे उच्च प्रमाण लक्षात घेता, नवजात शिशु तज्ज्ञांमध्ये नवजात मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. तीन दिवसीय या संम्मेलनात आघाडीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नवजात तज्ज्ञ सहभागी झाले होते.
 
बालरोगतज्ञ आणि निओनॅटोलॉजिस्ट डॉ. बिनय रंजन सांगतात की, अकाली जन्मलेल्या बाळांचे फुफ्फुस पूर्णपणे विकसित झालेले नाहीत त्यांना निओनेटल रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (NRDS), श्वासोच्छवासाच्या समस्या आणि ऑक्सिजनची कमतरता अशा समस्यांना सामोरे जावे लागते. एनआरडीएस हा अकाली जन्मलेल्या अर्भकांसाठी धोक्याचे ठरते. बालरोगतज्ञ, परिचारिका, पालक आणि कुटुंबियांनी त्याची त्वरीत लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. वेळीच तपासणी केल्याने वैद्यकीय उपचार घेता येतात. बाळाच्या श्वसन प्रणाली सुरळीत करण्यासाठी ते आवश्यक आहे. एनआरडीएसने ग्रस्त असलेल्या अर्भकांमध्ये जन्मानंतर लगेच श्वासोच्छवास करणे, ओठ, बोटांचा रंग बदलणे, श्वासोच्छवासाच्या वेळी नाकपुड्यांवर ताण येणे आणि श्वासोच्छवासास अडथळे येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. ज्यामुळे त्यांच्या छातीचे हाड आणि बरगड्यांवरील त्वचेवर दाब येतो.
 
नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. रंजन कुमार पेजावर यांनी बाळाच्या आरोग्यावर मोठ्या परिणाम करणाऱ्या एनआरडीएस सारख्या समस्येचे व्यवस्थापन करणे किती महत्त्वाचे आहे या विषयावर प्रकाश टाकला. वेळीच निदान हे त्वरीत उपचारास मदत करतात तसेच बाळाच्या श्वसन प्रणालीला मजबूत करतात आणि त्यांचे जगण्याचे प्रमाण देखील वाढते.
 
बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. कमलदीप अरोरा यांनी सांगितल्याप्रमाणे भारतात मुदतपूर्व जन्म होण्याचे प्रमाण चिंतेचे कारण ठरत आहे. अकाली जन्मलेल्या बाळांना ज्या आरोग्यविषयक गुंतागुंतांचा सामना करावा लागतो, प्रामुख्याने श्वासोच्छवासाच्या समस्या, गंभीर असतात आणि त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. या परिस्थितीत माता आणि नवजात शिशुंना त्वरीत वैद्यकिय मदतीची गरज भासते. हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि पॉलिसी मेकर्सनी देखील याकडे लक्ष दिले पाहिजे. नागरिकांना मुदतपूर्व प्रसुतीच्या धोक्यांबद्दल जागरुक करण्यासाठी आणि नवजात शिशु अतिदक्षता युनिट्सला चालना देण्यासाठी गरज आहे.
 
मुदतपूर्व बाळांना होणाराश्वसनाचा त्रास दूर करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर याठिकाणी चर्चा करण्यात आली. या परिषदेत बोलताना निओकॉन 2023 चे आयोजन अध्यक्ष, डॉ जयंत उपाध्ये यांनी निओनेटल रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (आरडीएस) संबंधीत उपलब्ध उपचार पध्दतींवर प्रकाश टाकला. हे नवजात मुलांचे व्यवस्थापन सुधारण्यात मदत करत आहे. या परिषदेदरम्यान, प्रत्येक नवजात बालकाची योग्य ती काळजी घेणे तसेच त्यांना योग्य उपचार कसे पुरविता येतील याविषयी देखील डॉ उपाध्ये यांनी माहिती दिली.
 
निओकॉन 2023 चे मुख्य संघटक सचिव डॉ. मिलिंद मंडलिक यांनी लवकर उपचार केल्यास होणारे फायदे व ते बाळाच्या विकासास कसे हातभार लावते हे स्पष्ट केले. जीवघेण्या परिस्थितींना प्रतिबंध करत योग्य व्यवस्थापनासाठी वेळीच आणि त्वरीत उपचार अतिशय गरजेचे आहे असेही डॉ. मंडलिक यांनी स्पष्ट केले. या परिषदेत नवजात शिशुंची योग्य काळजी कशी घ्यावी, त्यांच्यावर औषधोपचार कसे करावे, त्यांना वेळोवेळी सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करुन देणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चात्मक संवाद साधण्यात आला.
Powered By Sangraha 9.0