ज्येष्ठ निर्माते - दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन

24 Nov 2023 13:51:20

veteran film director raj kumar kohli passed away
 
मुंबई :
हिंदी चित्रपटसृष्टीतून आज एक एक दु:खद बातमी समोर आली आहे. 'नागिन' आणि 'जानी दुश्मन' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक-निर्माते राजकुमार कोहली (Raj Kumar Kohli) यांचे आज मुंबईत निधन झाले. अभिनेता अरमान कोहलीचे ते वडील होते. राजकुमार कोहली यांना आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती असून वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार कोहली हे आज सकाळी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. बराच वेळ होऊनही ते बाहेरआले नाही. तसेच त्यांचा आवाज देखील येत नसल्याने मुलगा अरमान कोहलीने बाथरूमचा दरवाचा तोडला. अरमान यांना वडील राजकुमार कोहमी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे यावेळी समोर आले. राजकुमार कोहली यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. 
 
1963 मध्ये निर्माता आणि 1973 मध्ये दिग्दर्शक म्हणून एक यशस्वी चित्रपट देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली यांनी धर्मेंद्र, जितेंद्र, हेमा मालिनी, सनी देओल, अक्षय कुमार आणि राज बब्बर यांच्यासह अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर सिनेसृतील मोठा धक्का बसला असून क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
 
राजकुमार कोहली यांनी 1963 मध्ये निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1963 मध्ये त्यांनी 'पिंड दी कुडी' आणि 'सपनी' या पंजाबी चित्रपटांची निर्मिती केली. यानंतर त्यांनी गोरा और काला, डंका, दुल्ला भट्टी, मैं जट्टी पंजाब दी या चित्रपटांची निर्मिती केली. मात्र, दिग्दर्शक म्हणून त्यांनी स्वत:ची मोठी आणि वेगळी ओळख निर्माण केली. 1973 साली 'कहानी हम सबकी' मधून दिग्दर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या राजकुमार कोहलीने आपल्या करिअरमध्ये नागिन, मुकाबला, जानी दुश्मन, बदले की आग, इन्सानियत का दुश्मन, जानी दुश्मन एक: अनोखी कहानी यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले.
Powered By Sangraha 9.0