नागपूर : इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला 'शिवराज्याभिषेक सोहळा' १६५६ मध्ये रायगडावर झाला आणि या वर्षी ६ जून २०२३ रोजी हा सोहळा आपले 350 वे वर्ष साजरे करत आहे. त्याचे औचित्य साधून मॉडर्न स्कूलचे इयत्ता ४ आणि ५ चे विद्यार्थी हातात स्वराज्याचा भगवा घेऊन आपल्या लाडक्या 'शिवबाच्या' राज्याभिषेकासाठी सज्ज राहणार आहेत. हा कार्यक्रम २५ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता मॉडर्न स्कूल, कोराडी रोड, नागपूर शाळेच्या द्विवार्षिक सांस्कृतिक सोहळ्यात हा 'शिवराज्याभिषेक सोहळा' होईल.
मॉडर्न स्कूलच्या संचालिका नीरू कपई, प्राचार्या सुश्री रुपाली डे, व्यवस्थापक रोहन कपई, मुख्याध्यापिका सुश्री आशा देशराज यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले आहे. कार्यक्रमाचे संयोजक रवी सातफळे, श्रीकांत पिसे आणि रितिका दलाल आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नितीन गाडगीळ, सुप्ता दत्ता, दीप्ती काळे यांचे सहकार्य लाभत आहे.