शहीद गोवारी बांधव-भगिनींना भाजपातर्फे अभिवादन

23 Nov 2023 18:03:29
 
martyrs-tribute-bhagini-govari-nagpur - Abhijeet Bharat
 
नागपूर : २८ वर्षापूर्वी तत्कालीन सरकारच्या असंवेदनशील निर्णयाचे पीडित ठरलेल्या ११४ शहीद गोवारी बांधव आणि भगिनींच्या स्मृतींना गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी अभिवादन करण्यात आले. नागपूर शहरातील झिरो माईल येथील शहीद गोवारी स्मारकस्थळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पचक्र अर्पण केले आणि शहीदांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली.
 
याप्रसंगी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष सतीश सिरसवान, शहीद गोवारी स्मारक समितीचे पदाधिकारी शालिक नेवारे व कैलाश राउत, इंद्रजीत वासनिक, महेंद्र प्रधान, अनंत जगनीत, आदेश वाशिमकर, रुणाल चौहान, अभिषेक टेंभुर्णे आदी उपस्थित होते.
 
हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या दुर्लक्षित आणि प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा या हेतूने २८ वर्षापूर्वी २३ नोव्हेंबर १९९४ साली गोवारी समुदायाद्वारे काढण्यात आलेल्या मोर्च्यावर शरद पवार यांच्या नेतृत्वातील तत्कालीन सरकारद्वारे पोलिसांकडून भ्याड लाठीहल्ला करविण्यात आला. या लाठीमारामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत संपूर्ण विदर्भातील विविध भागातून आलेले ११४ गोवारी बांधव, भगिनी, चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दिवसाच्या कटू आठवणीने आजही मन व्याकुळ होते. तत्कालीन सरकारने दाखवलेला असंवेदनशीलपणा ही इतिहासातील अत्यंत क्रुर आणि माणुसकीला लाजविणारी घटना आहे, असे मत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले.
 
तत्कालीन सरकारने त्यावेळी भ्याडपणे आंदोलकांवर हल्ला करण्याऐवजी आंदोलकांना सामोर जात त्यांच्याशी चर्चा केली असती तस आज ११४ परिवारांना हे दु:खाचे दिवस आठवून विलाप करण्याची वेळ आली नसती. सत्ता गेल्यानंतर केवळ जनतेप्रति संवेदनशीलता आणि जनहिताच्या गोष्टी करणाऱ्यांनी सत्तेत असताना ११४ निष्पापांचा बळी घेतला, हे वास्तव असल्याचा घणाघात देखील ॲड. मेश्राम यांनी केला आहे.
Powered By Sangraha 9.0