उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन

23 Nov 2023 16:16:50
 
devendra-fadnavis-visits-lakshmi-narsimha-temple-nira - Abhijeet Bharat
 
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृरसिंहाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर समितीचे विश्वस्त मंडळ, मंदिराचे मुख्य पुजारी विलास रामचंद्र दंडवते, पुजारी मंडळाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष श्रीकांत दंडवते, प्रसाद दंडवते, कमलेश डिंगरी तसेच ग्रामपंचायत नीरा नरसिंहपूरचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
 
कुलदैवत असल्यामुळे श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन आणि आशिर्वाद घेण्यासाठी वारंवार येत असतो. मध्यंतरी बराच कालावधी गेल्यामुळे दर्शनाची ओढ होती. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठूरायाच्या चरणी पूजेचा योग आला आणि इथेही श्री लक्ष्मी नरसिंहाच्या दर्शनाचा योग आला. त्यामुळे येथे दर्शन घेऊन आनंद झाला, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने पुजारी आणि विश्वस्तांनी पुणेरी पगडी घालून उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0