डॉ. सुनिती देव यांच्या दोन पुस्तकांचे 26 रोजी प्रकाशन

22 Nov 2023 12:53:25
 
suniti-dev-book-launch-vidarbha - Abhijeet Bharat
 
नागपूर : ज्येष्ठ लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, तत्त्वज्ञान विषयाच्या निवृत्त प्राध्यापिका स्व. डॉ. सुनिती देव यांच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या माळ्यावरील अमेय दालनात होणार आहे.
 
'विवेकाच्या गोठी' हा वैचारिक लेख संग्रह आणि 'एकसारखी नसती दोन' या दोन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभा गणोरकर, तसेच महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वि. सा. संघाचे कार्यकारी मंडळ आणि अभिजित व वृषाली देशपांडे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0