पारडी - पुनापूर येथील स्मार्ट सिटी अतंर्गत रस्त्याचे काम प्रभावित करणारे बांधकाम हटविले

22 Nov 2023 15:51:08
  • मनपा, स्मार्ट सिटी आणि पोलिस विभागाची कारवाई
nagpur-smart-city-removes-roadwork-paradeep-punapur - Abhijeet Bharat
 
नागपूर : नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत मौजा पारडी - पुनापूर - भरतवाडा येथे नगर रचना परियोजना अतंर्गत सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम प्रभावित करणारे 14 बांधकाम पैकी 10 बांधकाम मंगळवारी नागपूर महानगरपालिका, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून हटविण्यात आले. कारवाईच्या दरम्यान काही नागरिकांनी स्वत: आपले बांधकाम हटविण्याचे कबुल केले.
 
यावेळी नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि मनपाच्या अति, आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शानात कार्रवाई करण्यात आली. या वेळी स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, कंपनी सचिव भानुप्रिया ठाकुर, मुख्य नियोजक राहुल पांडे, पुनर्वसन अधिकारी ओमप्रकाश लांडे, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, विधी अधिकारी ॲड. मनजीत नेवारे, डॉ. पराग अरमल, मोईन हसन, श्रीकांत अहिरकर यांच्यासह मनपा अतिक्रमण विभाग आणि पोलिस विभागाच्या झोन क्र. ५ चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
स्मार्ट सिटीतर्फे मौजा पारडी, पुनापूर, भारतवाडा आणि भांडेवाडी येथे १७३० एकर क्षेत्रामध्ये ‘टेंडर शुअर’ प्रकल्पांतर्गत सुमारे 50 किलोमीटरच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत मौजा भरतवाडा येथील कळमना बाजार ते पावणगाव रोडच्या कामामध्ये सद्यस्थितीत असलेल्या बांधकामामुळे अडथळा निर्माण होत होता. संबंधितांना वारंवार सूचना आणि नोटीस देउनही बांधकाम हटविण्यात येत नसल्याने विकास कार्यात निर्माण होणारी बाधा लक्षात घेता मंगळवारी बाधीत बांधकाम निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. या सर्व बांधकामावर मनपा, स्मार्ट सिटी आणि पोलिस विभागाद्वारे संयुक्त कार्यवाही करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0