अतिरिक्त आयुक्तांनी घेतला मालमत्ता कर विभागाच्या कार्याचा आढावा

22 Nov 2023 15:58:17
 
nagpur-additional-commissioner-directs-revenue-department - Abhijeet Bharat
 
नागपूर : अतिरिक्त आयुक्त (शहर) मनपाद्वारा मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता मालमत्ता कर विभागाच्या कार्यासबंधी आढावा घेण्यात घेण्यात आला. आढावा बैठकीत उपायुक्त (महसुल), सर्व झोन सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
 
चालू आर्थिक वर्षा करीता मालमत्ता कर अपेक्षित आय रु ३०० कोटीचे उद्दिष्ट गाठणे हेतू निश्चित केलेले झोन निहाय दैनंदिन उद्दिष्ट प्रत्येक झोन द्वारा गाठणे अपेक्षित आहे. त्याकरीता झोन सहाय्यक आयुक्तांनी रू ५ लक्ष पेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकाकडे स्वत: जाउन थकीत रक्कम वसूल करून घेणे संबधी, तसेच रु १ लक्ष ते ५ लक्ष पर्यंत मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकाकडे सहायक अधीक्षक च्या नेतृत्वात मालमत्ता कर वसुली पथक द्वारा वसुली ची उचित कार्यवाही करुन घेण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) यांनी सर्व झोन सहाय्यक आयुक्तांना दिले. तसेच १३५६ थकबाकीदारा करीता काढलेल्या मालमत्ता कर वसुली वारंट अतंर्गत कार्यवाही पूर्ण करुन रु २५ कोटी थकीत मालमत्ता कर रक्कम ५ डिसेंबर २०२३ पर्यंत वसूल करणेचे निर्देश सर्व झोन सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले.
 
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम १२८ व कराधान नियम ४७ च्या तरतुदी अन्वये मालमत्ता कर थकीत रक्कम वसूल करणेकरीता संबधित स्थावर मालमत्ता व त्या मालमत्तेमधील जंगम मालमत्ताची जप्ती व अटकावणी करून जाहीर लिलाव द्वारे विक्री करण्याचा अधिकार नागपूर महानगरपालिकेस आहे व सदर अधिकाराचा वापर करून थकबाकीदाराच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त व अटकावणी करुन जाहीर लिलाव प्रक्रिया राबवून विक्री करुन थकीत मालमत्ता कर वसूल करण्याची धडक मोहीम नागपूर महानगरपालिका द्वारा सुरू करण्यात आलेली आहे. चालू आर्थिक वर्षाकरीता मालमत्ता कर आय द्वारा रु ३०० कोटी प्राप्त करण्याचे उद्दिष्ट असून २० नोव्हेंबर २०२३ रोजी पर्यंत रु १५० कोटी नागपूर महानगरपालिका निधीत मालमत्ता करापोटी जमा झालेले आहेत मागील वर्षी २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत नागपूर महानगरपालिका निधीत रू ११५ कोटी मालमत्ता करापोटी जमा झालेले होते. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात २१ नोव्हेंबर पर्यंत रू ३५ कोटी ची वाढ आहे. टक्केवारी मध्ये ३० टक्क्यांनी चालू आर्थिक वर्षात वाढ झालेली आहे.
Powered By Sangraha 9.0