सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या १०३ प्रकरणांची नोंद

21 Nov 2023 14:08:31
  • उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
public-spaces-cleanliness-drive-nagpur - Abhijeet Bharat 
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. रविवारी आणि सोमवारी उपद्रव शोध पथकाने १०३ प्रकरणांची नोंद करून ७०,३०० रुपयाचा दंड वसूल केला.
 
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. हाथगाड्या स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २५ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ३ प्रकरणांची नोंद करून ३०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून ८०० रुपयांची वसुली करण्यात आली.
 
वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत २१ प्रकरणांची नोंद करून १९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे, या व्यतिरिक्त व्यक्तिविरुध्द व संस्थांविरुद्ध ३ जणांवर कारवाई करण्यात आली असून ३००० रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकाम मलबा/ टाकाऊ कचरा टाकण/ साठवणे, प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास ३ प्रकरणांची नोंद करून रु ३००० दंड वसूल करण्यात आला आहे.
 
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २६ प्रकरणांची नोंद करून रु ५२०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १९ प्रकरणांची नोंद करून रु १९,००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या ३ जुलै २०१७ च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लौन्स यांच्यावर कारवाही करणे याप्रकरणी १ प्रकरणाची नोंद करून रु १० हजार दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0