विशाखापट्टणम येथील मासेमारी बंदरात भीषण आग; 40 मासेमारी नौका जळून खाक

20 Nov 2023 15:21:37
  • कोट्यावधींचे नुकसान
vizag-boat-fire-tragedy - Abhij
 
विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका मासेमारी बंदरावर सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमुळे बंदरावर उभ्या असलेल्या सुमारे ४० मासेमारी नौका जाणून खाक झाल्या आहेत. तसेच घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत अनिवार नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. या घटनेत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम मासेमारी बंदरात सुरुवातीला एका नौकेला नाव लागली. हळूहळू ही आग पसरत गेली. या आगीत ४० नौका आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास करत आहेत. बंदरातील आगीमुळे सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नौकांना लागलेली आग पाहून नौकाचालकांचे अश्रू थांबत नाहीत. काही गुन्हेगारांनी बोटींना आग लावल्याचा संशय मच्छिमारांनी व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
पोलीस उपयुक्त आनंद रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम मासेमारी बंदरात एका बोटीला आग लागली आणि नंतर मध्यरात्री सुमारे 35 फायबर-यंत्रीकृत नौकांमध्ये पसरली. पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने प्रतिसाद दिला. आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0