आघातातून प्रत्याघात करणारे जिजाऊंचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरक - सद्गुरुदास महाराज

19 Nov 2023 14:33:33
  • शिवराज्याभिषेक समवेत जिजाऊंचे 350वे पुण्यस्मरण आवर्जून व्हावे
 jijabai-inspiring-personality-sadgurudas-maharaj-event - Abhijeet Bharat 
नागपूर : अनेक संकटे, गरीबी, घात-पात, कत्तली अश्या अत्यंत कष्टदायी परिस्थितितून खंबीरपणे आणि आघाततून प्रत्याघात करणारे असे जिजाऊंचे प्रेरक व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन धर्मभास्कर सदगदुरूदास महाराज यांनी केले. शंकरनगर नागरिक सांस्कृतिक मंडळ, शंकर नगर आणि श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध शिवकथाकार सद्गुरूदास महाराज यांच्या द्वि-दिवसीय व्याख्यानमालेचा कार्यक्रम शंकरनगर हनुमान मंदिराजवळील मैदानात व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्याख्यानमालेतिल 'देदिप्यमान जिजामाता' हे पहिले पुष्प गुंफाताना ते बोलत होते. यंदा श्री शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष सुरू आहे. या निमित्ताने संस्थेतर्फे सद्गुरूदास महाराजांचा सत्कार व शिवरायांच्या जीवनावर आधारित व्याख्यानमाला होत आहे. या विषयावर पहिले पुष्प महाराजांनी आज गुंफले. वामनराव पत्तरकीने यांच्या जन्मशताब्दी निमित्त हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक समवेत जिजाऊंचे 350वे पुण्यस्मरण आवर्जून व्हावे असे आवाहन सद्गुरूदास महाराज यांनी यावेळी केले.
 
निजमाने राखीच्या दिवशी जिजामाता यांच्या भावांची कत्तल केली होती. त्यावेळी शिवाजी महाराज जिजाऊंच्या गर्भात होते. भावांच्या कत्तलीचे दुख गिळून खंबीरपणे पुढे वाटचाल करित आणि स्वराज्याचा विचार आणखी बळकट करित जिजाऊ यांनी शिवाजी महाराज घडवितांनाचे अनेक प्रसंग सद्गुरूदास महाराज यांनी सांगितले. जिजाऊ यांचे वात्सल्य, नेतृत्व, दूरदृष्टि, समयसूचकता, निर्णय क्षमता अश्या अनेक गुणांचा परिचय करून देताना सद्गुरूदास महाराज यांनी अनेक प्रसंग अक्षरशह जीवंत केले.
 
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती, शंकर नगरचे अध्यक्ष, संदीप चव्हाण यांनी सद्गुरुदास महाराज यांचे स्वागत केले. सुरवातीला स्वाती पटवर्धन यांनी ‘धन्य धन्य शिवाजी’ हे गीत गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सद्गुरुदास महाराज यांचा अल्प परिचय रमेश शिलेदार यांनी केले. सदगुरूदास महाराज आणि त्यांचे शंकरनगरचे वास्तव्य आणि संघाच्या शाखांशी संबंध याविषयी शिलेदारांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचालन मंजूषा आठल्ये यांनी केले. शंकरनगरच्या पत्तरकिने परिवाराने कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
 
किल्ले स्पर्धेचे पारितोषिक वितरण
 
प्रफुल माटेगवकर यांच्या पुढाकाराने आयोजित किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. या स्पर्धेच्या विजेत्यांना सद्गुरुदास महाराज यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. रायगड किल्ला सकारल्या बद्दल अभिजीत जाधव, सुविकार देशमुख यांना पहिले पारितोषिक देण्यात आले. शिवनेरी किल्ला साकारल्याबद्दल अथांग बडगे याला दुसरे तर राजगड प्रतिकृतिसाठी हर्षल आत्राम याला तिसरे पारितोषिक देऊ करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0