नागपूर :
दिवाळी पाडवानिमित्त माऊली मित्र मंडळाचा (Mauli Mitra Mandal) महानगर पालिकेचे साफसफाई कर्मचारी यांच्यासोबत दिवाळी मिलन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. भगवान नगर येथील बँक कॉलोनीच्या श्रीराम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर पोलिस निरीक्षक रिटा,अरविंद सराफ, डॉ. सुधाकर बोरकर, ATS चे पोलिस निरीक्षक प्रदिप लांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गांगुलवार यांनी तर आभार प्रर्दशन सराफ यांनी केले.
डॉ. सुधाकर बोरकर यांनी सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबत माहिती दिली. तसेच समाजात युवा पिढी अंमली पर्दाथाच्या विळख्यात सापडली आहे ती वाचावण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहे. यासाठी शहरात कुठेही अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असेल तर पोलिसांना कळवा, असे आवाहन ATS चे प्रदिप लांडे यांनी केले. यावेळी सर्व 87 सफाई कर्मचारी यांना साडी टाँवेल व स्वीट बाँक्सचे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. यासाठी विलास सोनारे, मनोज गावंडे, दरवारे, मानकर, अर्चना कोट्टेवार, वगारे, मुडे, सुरेंद्र खरे, राजेश ऊमाटे, सुहास खरे, मनोहर तारसेकर, पाठक, चव्हारे, वस्तीतील वानखेडे यांचा सत्कार करून सर्वांना माठाई वाटप करून माऊली मित्र मंडळाने दिवाळीचा हा अनोखा उपक्रम साजरा केला.