- 18 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान चालणार स्पर्धा
नागपूर : नागपूर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने शनिवार 18 नोव्हेंबर ते शनिवार 2 डिसेंबर दरम्यान 'स्व. प्रभाकरराव दटके मेमोरियल ट्रॉफी' (T-20 मॅचेस) स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेचे सर्व सामने 'यशवंत स्टेडियम' येथे सकाळी 8 ते 12 वाजता दरम्यान खेळविल्या जाणार आहेत.
नागपूर महानगरपालिका कर्मचारी क्रिकेट संघ हा एक उत्तम क्रिकेट संघ असून, अनेक स्पर्धेत या संघाने उत्तम कामगिरी केलेली आहे. हा कर्मचारी संघ 'यशवंत स्टेडियम' येथे अनेक वर्षांपासून सराव करीत आहे. या कर्मचारी संघटनेच्या सहकार्याने 18 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत स्व. प्रभाकरराव दटके मेमोरियल ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 'यशवंत स्टेडियम' येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेत दोन ग्रूप असून, प्रत्येक ग्रुप मध्ये पाच संघ आहेत. प्रत्येक संघास साखळी पद्धतीने चार सामने खेळता येतील व पात्र संघास बाद पद्धतीने उपांत्य व अंतिम फेरी गाठता येईल. ही स्पर्धा 20-20 षटकांची असून, पांढऱ्या लेदर बॉलनी सामने खेळविण्यात येईल तथा खेळाडूंना रंगीत पोशाखाचे बंधन राहील. स्पर्धा या खुल्या वर्गातील आहे. स्पर्धेचे आयोजन आमदार प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनात संपन्न होइल.
नागपूर शहरात अनेक क्रिकेटपटू आहेत, सर्व क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा स्पर्धेतून त्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त व्हावी हा उद्देश ठेवून अशा प्रकारचे स्पर्धेची सन 2018 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे.
स्पर्धेतील संघ
- नागपूर महानगरपालिका नागपूर
- गिरडकर इलेव्हन (एडवोकेट ग्रूप)
- जिल्हाधिकारी इलेव्हन, नागपूर
- एस. बी. सीटी क्रिकेट अकादमी
- ओनली क्रिकेट क्लब, राम-नगर
- फ्युचर इलेव्हन क्रिकेट क्लब
- रॉयल टायगर क्रिकेट क्लब
- एआयजी स्पोर्ट अकादमी
- स्पोर्ट्स एडिक्शन ग्रूप
- सिटी जिमखाना