China Shanxi Fire: चीनमधील कोळसा कारखान्याला भीषण आग, 25 जणांचा मृत्यू

16 Nov 2023 16:31:40

china-shanxi-coal-mine-fire-tragedy - Abhijeet Bharat 
बीजिंग : चीनमधील उत्तर शांक्सी प्रांतामध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. शांक्सीतील लुलियांग येथे कोळसा खाण कंपनीच्या कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कार्यालयातील आगीमुळे अनेक जण जखमी झाले आहेत. या आगीचे स्वरूप तीव्र असल्याने येथे अडकलेल्या लोकांना वाचवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना देखील आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शेजारील देशातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक केंद्र असलेल्या शांक्सी येथील योंगजू कोळसा खाण कंपनीच्या ४ मजली कार्यालयात आगीची घटना घडली. गुरुवारी सकाळी 6:50 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून कोळसा कंपनीने देखील याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही.
Powered By Sangraha 9.0