Nagpur : न्या. नितीन सांबरे नवे प्रशासकीय न्यायाधीश

10 Nov 2023 15:22:32

Justice Nitin Sambare

नागपूर :
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासाठी नवीन वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नितीन सांबरे (Justice Nitin Sambare) यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी गुरुवारी ही नियुक्ती केली.
 
न्यायमूर्ती नितीन सांबरे हे नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या जागी रुजू होती. न्यायमूर्ती अतुल चांदुरकर सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर मुंबई येथे रूजू होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे नवनियुक्त प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती नितीन सांबरे मुळचे नागपूरचे आहेत. त्यांनी सोमलवार हायस्कूल, शिवाजी विज्ञान महाविद्यालयात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शहरातील विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
 
2014 मध्ये न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी दीर्घकाळ नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून काम केले. तत्कालीन ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती श्री. शरद बोबडे यांचे सोबतच त्यांनी कायदेशीर कार्याची सुरूवात केली. दिवाणी, रिट आणि फौजदारी खटल्यांवर त्यांनी मुंबई, नागपूर उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.
Powered By Sangraha 9.0