करवा चौथ स्पेशल : मोहक लुकसाठी या सोप्या मेकअप टिप्स वापरून पहा

01 Nov 2023 13:24:25

karava chauth look

नागपूर:
विवाहित महिलांसाठी विशेषतः नवविवाहित महिलांसाठी करवा चौथचा उपवास महत्त्वाचा असतो. परंपरेनुसार, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी निर्जला उपवास ठेवतात. या दिवशी घरातील वडीलधारी मंडळी, सासू आपल्या सुनेला सारंगी देते, जी महिला सकाळी सूर्योदयापूर्वी खाऊ शकतात. हा व्रत सूर्योदयापासून सुरु होतो आणि संध्याकाळी पूजा करून चंद्रदर्शनाने समाप्त होतो. या दिवशी केलेल्या शृंगाराचे सुद्धा विशेष महत्व आहे. स्त्रिया हातावर मेहेंदी लावतात, आलात लावतात आणि नववधूप्रमाणे सुंदर कपडे परिधान करून तयार होतात.तुम्हालाही या दिवशी जरा हटके लूक पाहिजे असेल, तर या सोप्या मेकअप टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील.
 
karava chauth look
(Image Source : Internet) 
टोनिंग :
 
तुमचा चेहरा स्वच्छ केल्यानंतर, तुमच्या त्वचेला ताजेपणा आणण्यासाठी प्रथम टोनर वापरू शकता.
 
karava chauth look
(Image Source : Internet)
सीरम:
 
बरेच लोक टोनिंग केल्यानंतर मॉइश्चरायझर लावतात. पण चमकदार आणि हायड्रेटेडत्वचेसाठी, तुम्ही मॉइश्चरायझिंग करण्यापूर्वी सीरमचा वापर करू शकता. आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचे पोषण तुमचा चेहरा दिवसभर हायड्रेटेड आणि चमकदा ठेवण्यात मदत करतो.

karava chauth look
(Image Source : Internet) 
मॉइश्चरायझर:
 
टोनर आणि सीरम लावल्यानंतर मॉइश्चरायझ लावा जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला भरपूर पोषण मिळेल.

karava chauth look (Image Source : Internet)
प्राइमर:
 
पुढील चरणात आता, आपल्या चेहऱ्यावर प्राइमर लावा. हे मेकअपला चांगल्या प्रकारे प्रकारे ब्लेंड करण्यास मदत करते.

karava chauth look(Image Source : Internet) 
फाउंडेशन:
 
यानंतर त्वचेवर फाउंडेशन लावून चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे पसरवून घ्या. आय शॅडो लावताना आपल्या आवडीनुसार लाईट किव्हा स्मोकी शेड तुम्ही घेऊ शकता.

karava chauth look (Image Source : Internet) 
आय लायनर :
 
हा लुक पूर्ण करण्यासाठी डोळ्यावर आय लायनर, मस्करा आणि काजल लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ड्रेसला कॉन्ट्रास्टिंग आय लायनरही लावू शकता. शेवटी, चमकदार लाल, गुलाबी किंवा न्यूड लिपस्टिक लावा. याशिवाय, लहान बिंदी, मोठे कानातले आणि चोकर नेकलेससह तुम्ही संपूर्ण लुक आणखी वाढवू शकता.
 
karava chauth look
(Image Source : Internet) 
हेयरस्टाईल : 
 
तुमच्या आवडीनुसार तुम्ही आउटफिटशी तुमच्या बांगड्या मॅच करू शकता आणि हेअरस्टाइलसाठी जुडा बांधून त्यावर गाजर लावू शकता. किंवा केसांची वेणी सुद्धा करू शकता.
 
 
 
 अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Powered By Sangraha 9.0