व्हीएमव्ही महाविद्यालयात गांधी जयंती साजरी

05 Oct 2023 12:38:07
 
vmv-college-gandhi-jayanti-celebrations - Abhijeet Bharat
 
नागपूर : पूर्व नागपूर, वर्धमान नगर येथील व्हीएमव्ही कॉलेज येथे गांधी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन सादरीकरण झाल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय मुदगल यांनी गांधीजींचे दुर्मिळ संवेदनशील व्यक्तिमत्व अधोरेखित करताना सांगितले की, गांधींच्या तत्त्वज्ञानाचे आणि विचारांचे आकलन करणे म्हणजे एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्यासारखे आव्हान आहे.
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जळगावच्या सांस्कृतिक वारसा संस्थेचे संस्थापक तथा नागपूरचे आर. एफ. आर. एफ. संस्थेचे संचालक डॉ. भुजंग बोबडे यांनी 'अत्त दीप भव' या विशाल भारतीय परंपरेच्या संदर्भात गांधींच्या तत्त्वज्ञानाची रूपरेषा सांगताना म्हंटले की - आजच्या तरुणांनी गांधीजींचे निर्णय आणि तात्कालिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्याची नितांत गरज आहे.गांधी विचार आपल्या जीवनात अंगीकारले तर आपल्या माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न सुटेल. गांधीजींनी प्रायोगिकपणे भारतीय ज्ञान परंपरेची मूलभूत शिक्षण पद्धत भारताच्या शिक्षण पद्धतीत लागू केली.
 
श्री नागपूर गुजराती मंडळाचे उपाध्यक्ष अधिवक्ता नरेंद्र झा आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की गांधीजींना शब्दार्थ, भावार्थ, मतीतार्थ, आणि गूढ अर्थ या संकल्पनांच्या संदर्भात समजून घ्यावे. तेव्हाच गांधीजींनी शिक्षणाशी रोजगाराची सांगड घालून तयार केलेल्या मॉडेलची प्रासंगिकता आपण समजून घेऊ शकू.
 
यावेळी व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या प्राध्यापिकांनी नरसी मेहता लिखित गांधीजींच्या आवडत्या भजन 'वैष्णव जन ते तेणे कहिये जे पीड पराई जाने रे...' या भजनाचे सुरेल संगीत सादरीकरण केले. प्रा. सलीम शेख यांच्या दिग्दर्शनाखाली महाविद्यालयाच्या बीव्होक नाट्य विभागातील विद्यार्थी कलाकारांनी 'अब क्या करोगे' या नाटकाचे प्रभावी सादरीकरण केले. याप्रसंगी गांधीजींच्या प्रसारात दिलेल्या योगदानाबद्दल माजी उपप्राचार्य प्रा. सिंग सर आणि गांधी विचारधारा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या प्राध्यापकांना प्रा. माधुरी तिवारी, डॉ. सोनू जेसवानी, डॉ. सुधा जांगीड, प्रा. निखिल जोशी आणि सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविणारे प्रा. आशा वर्मा यांचा पाहुण्यांच्या हस्ते भगवद्गीता देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राधा मोहरे तर आभार प्रदर्शन बीव्होक नाट्य विभाग प्रमुख प्रा. प्रियांका ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अमर बोंद्रे, प्रा. पारस वाढेर, डॉ. गौरव नल्हे, लाहिरी यांनी अथक परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0