भाऊसाहेब ग्रामस्थ जन्मशताब्दी महोत्सव 1 नोव्हेंबरपासून

31 Oct 2023 17:24:38
  • धर्मभास्कर श्री सद्गुरुदास महाराजांची विशेष उपस्थिती
bhau-saheb-gramsth-birth-centenary-celebration-katol - Abhijeet Bharat
 
नागपूर : श्री. स. ना. बाबाजी महाराज ग्रामस्थ आश्रम, लोधीखेडा यांच्यातर्फे 1 ते 4 नोव्हेंबर 2023 दरम्‍यान प.पू. श्री भाऊसाहेब ग्रामस्थ जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला श्री सद्गुरुदास महाराज यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
 
यानिमित्त चार दिवस नित्यपूजा, काकड आरती, प्रातःस्मरण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. बुधवारी 1 तारखेला 10 वाजता प.पू. श्री. विजय काका पोफळी यांच्या उपस्थितीत भाऊसाहेबांच्या आठवणी, 2 वा. मंजुषा सराफ यांचे प्रवचन व रात्री 9 वाजता ईश्वर महाराज उईके यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवार 2 रोजी सकाळी 10 वाजता डभोई पिठाधीश्वर स्वामी सुदर्शनाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत भाऊसाहेबांच्या आठवणी, 2 वाजता सुरेंद्र महाराज ठाकरे यांचे प्रवचन, रात्री 9 वाजता श्री चिंतामण महाराज गुरवे यांचे कीर्तन होईल तसेच, शुक्रवार, 3 रोजी सकाळी 8 वाजता धर्मभास्कर प.पू.श्री सद्गुरुदास महाराज यांच्या उपस्थितीत श्रीराम जयराम जयजयराम चा मंत्र स्वाहाकार, दुपारी 2 वाजता मुक्ता धानोरकर यांचे कीर्तन, रात्री 9 वा. आळंदीचे उत्तम महाराज बडे यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार, 4 रोजी 5 वाजता नित्यपूजेनंतर श्रीमती मंजूषा सराफ रचित भूपाळी पदे, सकाळी 8 वाजता देवनाथ मठाचे मठाधिपती आचार्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव व पालखी, दुपारी 11 वाजता श्रीरामपंत जोशी यांचे कीर्तन व दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.
 
सर्व भक्तांनी कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन बाबाजी महाराज ग्रामस्थ आश्रमचे अध्यक्ष नंदकिशोर बेलसरे, कार्यवाह नारायण धानोरकर यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0