खुलेपणाने प्रेम साजरी करणारी ‘रेनबो रिश्ता’ मालिका झळकणार ‘प्राईम व्हिडिओ’वर!

    30-Oct-2023
Total Views |
 
rainbow-relationship-premieres-on-prime-video - Abhijeet Bharat
 
नागपूर : येत्या ७ नोव्हेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर ‘रेनबो रिश्ता’ या नव्या मालिकाचा प्रीमियर होत आहे. खुलेपणाने प्रेम साजरे करणार्‍या सहा विलक्षण सुंदर कथांचा समावेश असलेली ही एक अनस्क्रिप्टेड डॉक्यु सीरीज अर्थात् वास्तव जीवनावर आधारित माहितीपट मालिका आहे.
 
‘एलजीबीटीक्युआयए’ अर्थात लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीअर, क्वेश्चनिंग, इंटरसेक्स, एसेक्शुअल आणि यांसारख्या वैविध्यपूर्ण लैंगिक ओळख असलेल्या समुदायाच्या काही सदस्यांचे प्रेम या मालिकेतील कथांतून व्यक्त केले जाईल. रंजनाचे सर्वात प्रिय ठिकाण असलेल्या ‘प्राइम व्हिडिओ’ने आज ‘रेनबो रिश्ता’ ही एक वास्तव जगण्याला थेट भिडणारी मालिका जाहीर केली आहे, ज्यात सहा प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी ‘एलजीबीटीक्युआयए’ प्रेमकथा रसिकांसमोर उलगडल्या जातील. ७ नोव्हेंबर रोजी शुभारंभ केली जाणारी ‘रेनबो रिश्ता’ ही मालिका भारतात आणि जगभरातील २४० देश- प्रदेशांमध्ये दिसू शकेल. ‘रेनबो रिश्ता’मुळे ‘प्राईम’च्या रंजनात नवी भर घातली गेली आहे. भारतातील ‘प्राइम’ सदस्य केवळ १,४९९ रुपयांत वर्षाचे सदस्यत्व प्राप्त करताना बचतही करू शकतात. या एकाच शुल्कात बचत, सुविधा आणि मनोरंजनाचा आनंद त्यांना प्राप्त करता येईल.
 
 
 
नव्वदीच्या दशकाच्या सनसनाटी सिनेमांवर आधारित आधुनिक पंथातील क्लासिक सिनेमा ‘मरते दम तक’च्या यशानंतर, ‘रेनबो रिश्ता’ हा ‘प्राईम व्हिडिओ’ने ‘व्हाइस स्टुडिओ प्रॉडक्शन्स’शी सहयोग करण्याची ही दुसरी वेळ आहे. सहा भागांची ही माहितीपट मालिका जयदीप सरकार यांनी दिग्दर्शित केली असून कथा दिग्दर्शक हृदय ए. नागपाल आणि शुभ्रा चॅटर्जी आहेत. या मालिकेद्वारे ‘एलजीबीटीक्युआयए’ समुदायाच्या सदस्यांच्या जीवनातील अनोख्या, सुस्पष्ट आणि कालातीत कथा जगासमोर उलगडल्या जातील. या वास्तवातील जगणे अधोरेखित करणाऱ्या मालिकेत देशाच्या कानाकोपऱ्यातील त्रिनेत्रा हलदर, ऐश्वर्या आयुष्मान, डॅनिएला मेंडोन्का, अनीज सैकिया, सनम चौधरी, सोहम सेनगुप्ता, सुरेश रामदास आणि सदाम हंजाबम यांचे वास्तव जीवनातील अनुभव मांडण्यात आले आहेत.
 
नव्याने दाखल होत असलेली ‘रेनबो रिश्ता’ ही मालिका म्हणजे खास ‘प्राइम व्हिडिओ’द्वारे ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३’ उत्सव साजरा करण्याचा एक भाग आहे. या उत्सवादरम्यान अनेक भाषांमधील अनेक नवनिर्मित मालिका आणि ब्लॉकबस्टर चित्रपट नव्याने दाखल होत आहेत. ‘प्राईम व्हिडिओ स्टोअर’वर मूल्य अदा करून काही विशिष्ट मालिका अथवा चित्रपट भाड्याने घेणाऱ्या प्रारंभीच्या एक हजार ग्राहकांना दररोज विशेष सवलत आणि एकाहून अधिकधिक ‘प्राईम व्हिडिओ चॅनेल’वर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यासोबतच ग्राहकांकरता 'दिवाळी स्पेशल ऑफर'ही उपलब्ध आहे.