नागपूर : वीरशैव संत कक्कया ढोर समाजातील थोर व आदर्श लोकनेते, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी मंत्री तसेच विविध राज्याचे राज्यपाल म्हणून लौकिक मिळविलेले कै. ना. गणपतराव देवजी तपासे यांची ११५ वी जयंती सोहळा धारावीतील एन शिवराज उद्यानात शनिवार २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत पाटील, खासदार राहुल शेवाळे, धारावी विधानसभा आमदार वर्षा गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार धर्मा सोनकवडे, माजी आमदार सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर जयंती सोहळ्याचे आयोजन संत कक्कया विकास संस्था धारावी यांनी केले असून या जयंती सोहळ्यास संत कक्कया समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे जयंती सोहळ्याचे प्रमुख संत कक्कया विकास संस्थेने आवाहन केले आहे.