‘अखंड घुंगरू नाद’चे 29 ऑक्टोबरला आयोजन

28 Oct 2023 14:28:12
  • 135 कलाकार 12 तास करणार अखंड नर्तन
classical-dance-festival-akhanda-ghungroo-naad - Abhijeet Bharat 
नागपूर : धरमपेठ शिक्षण संस्थेद्वारा संचालित नटराज आर्ट ॲण्ड कल्चर सेंटरतर्फे 'अखंड घुंगरू नाद-2023' या शास्त्रीय नृत्य सोहळ्याचे रविवार, 29 ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात 135 कलाकार 12 तास अखंडपणे कथक, भरतनाट्यम्, मोहिनीअट्टम, ओडीसी, कुचीपुडी आदीं शास्त्रीय नृत्य प्रकार सादर करणार आहेत.
 
श्री विनायकराव फाटक स्मृती सभागृह, धरमपेठ म. पां. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर येथे सकाळी 7.30 वाजता नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी 8 वाजता शास्त्रीय नृत्यांच्या सादरीकरणाला सुरुवात होईल. हा कार्यक्रम सलग 12 तास म्हणजेच सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
 
कार्यक्रमात कला सादर करणार्‍या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर, सचिव मंगेश फाटक, तसेच नटराज आर्ट अ‍ॅण्ड कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रवींद्र हरिदास यांनी सांगितले आहे. आपण सर्व या कार्यक्रमाकरिता सादर आमंत्रित आहात.
Powered By Sangraha 9.0