अमरावती : दस्तुरनगर चौकातील मार्गावर रविवार, 22 ऑक्टोंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास वन्यप्राणी साळींदर भटकून लोकवस्तीमध्ये आला. त्याचा मुक्तसंचार पाहून नागरिकांना भीती व कुतूहल वाटले, यासंदर्भात नागरिकांनी वनविभागाला माहिती देण्यात आली असून, वनविभागाच्या चमुने रात्रीच दस्तुर नगर परिसरात जाऊन पाहणी केली.
20 ऑक्टोंबर रोजी साधना कॉलनी व न्यु कॉलनीत साळींदर दिसला. तो याच परिसरात मुक्तसंचार करीत असून, 22 ऑक्टोंबर रोजी पुन्हा दस्तुरनगरातील मार्गावर फिरताना दिसला. त्यानंतर साळींदर हा संत कंवरराम विद्यालयाच्या आतील परिसरात गेला. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये साळींदर चा मुक्तसंचार कैद केला.