बिडकर भगिनी ऑरेंज सिटी आयकॉन पुरस्काराने सन्मानित

    26-Oct-2023
Total Views |
 
sushila-and-baby-dasharathrao-bidakar-orange-city-icon-award - Abhijeet Bharat
 
वरुड : असिम परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि पोलादी हिमतीच्या जोरावर अल्पावधीतच नावलौकिक मिळालेल्या तालुक्यातील पुसला येथील कृषी कन्या बिडकर भगिनींना ऑरेंज सिटी आयकॉन या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
लहान वयातच आईवडिलांचे छत्र हरवलेल्या या उच्चशिक्षित भगिनी आहे. वडील 2009 मध्ये वडील आणि अवघ्या तीन वर्षात म्हणजे 2012 मध्ये मातृछत्रही हरविले. तेव्हापासून या दोघी सातत्याने शेतीत कष्ट उपसतात. गावापासून 10 कि.मी.अंतरावर जंगलात असलेल्या शेतीत रात्री-अपरात्री जाऊत ओलीत करणे, कधी सायकलने तर कधी पायी प्रवास करणे, काही लोकांच्या वाईट नजरेतून बचावत त्यांनी खूप यातना सोसल्या. त्यांच्या संघर्षाचा सन्मान म्हणून नागपूर येथील धरमपेठ येथे 15 ऑक्टोंबर 2023 ला महिमा बहुउद्देशीय संस्थेमार्फत ऑरेंज सिटी आयकॉन पुरस्कार देऊन सुशीला व बेबी दशरथराव बिडकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री शेखर मुंडदा, माजी मंत्री परिणय फुके, आयोजक ज्येष्ठ समाजसेविका डॉ.नम्रता आनंद, शीतल पाटील, बबिता धूर्वे यांच्या उपस्थितीत सदरचा सोहळा पार पडला.