पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवून 32.85 लाखांनी गंडविले; सायबर ठाण्यात गुन्हा दाखल

26 Oct 2023 15:43:42
 
part-time-job-scam-fraud-case-32.85-lakh - Abhijeet Bharat
 
अमरावती : टेलिग्रामवर पार्ट टाईम जॉब असल्याची बतावणी करून एका इसमाची चक्क 32 लाख 85 हजार 374 रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या धक्कादायक घटनेच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी टेलीग्रामवरील ट्रायगो क्बॅलच्या वेबसाईटवरील संबंधिक व्हॉटसअॅप क्रमांक व 13 वेगवेगळ्या बॅक खात्याच्या धारकांविरुध्द फसवणुकीसह माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.
 
अमरावती शहरातील एका व्यक्तीच्या टेलीग्रामवर पार्ट टाईम जॉब असल्याबाबत संदेश प्राप्त झाले होते. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर त्यांना एका व्यक्तीने सपर्क केला. संबंधित व्यक्तीने ट्रायगो रेटिंगबाबत काम असल्याची बतावणी करून, त्यांना पैशांचे आमिष दाखविले. त्यानंतर टॉस्क जॉब देऊन वेगवेगळ्या बॅक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी 32 हजार 85 हजार 374 रुपये ऑनलाईन पाठविले. परंतू आपली फसवणुक झाल्याचे समजताच त्यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.
 
क्रेडिट कार्ड विषयी बतावणी करून तीन लाखांनी फसवणूक
 
क्रेडीट कार्ड विभागातून बोलत असल्याची बतावणी करून, एका इसमाला क्रेडीट कार्ड अॅक्टीव्ह करण्याबाबत कॉल करण्यात आला. परंतु क्रेडीट कार्ड बंद करायचे असल्याचे त्यांनी संबंधित कॉल करणार्याला सांगितले. दरम्यान त्यांना एने डेक्स अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून, त्यांच्या खात्यातून 3 लाख 17 हजार 106 रुपयांची रक्कम काढून ऑनलाईन फसवणुक करण्यात आली. या घटनेची तक्रार महेंद्र अमृतराव बाळसराफ (50, रा. अर्जुन एम्पायर, शिलांगण रोड, नवाथेनगर) यांनी 23 ऑक्टोंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी एका मोबाईल क्रमांकाच्या धारकाविरुध्द गुन्हा नोंदविला.
Powered By Sangraha 9.0