अमरावती : फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी एका महिलेसह तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना रविवार, 22 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. यशोदानगर चौकात एका भाजीपाला विक्री करणार्या तरुणावरून तर संजय गांधी नगरात एका महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे.
यशोदानगरात भाजीपाल्याची हातगाडी लावणारे संजय हरिभाऊ गायबले यांच्या पार्श्वभागावर अचानक चाकूने करण्यात आला. त्यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी रोहीत गजघाटे (19, रा. यशोदानगर), गोलु भिमराव रामटेके (25) व अन्य दोन जणांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. तर संजय गांधी नगर न.1 मध्ये एका महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेची तक्रार गोविंद अमृतराव गेडाम (रा. संजय गांधीनगर न.1) यांनी 22 ऑक्टोंबर रोजी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी तिन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.