हिवरखेड : मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे स्व.प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्यविकास व उद्योजकता विकास केंद्राचे उद्घाटन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 512 ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. ज्यामध्ये हिवरखेडचासुध्दा समावेश आहे.
हिवरखेड येथे झालेल्या कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रविण राऊत, प्राचार्य कमलकिशोर फुटाणे, हरिभाऊ सुखसोहळे, निलेश शिरभाते, सविता मालपे, सचिन तायवाडे, बाळासाहेब भोजने, संजय पाचघरे, मनोज मोकलकर, गोपाल मालपे, राजेश खाटगले, शेखर गावंडे, हरविजय गेडाम, उत्तम उपासे, संजय बोंडे, दोड, पुरुषोत्तम अंबारे, छाया बचले, छाया शिरभाते, कविता वरठी, लता फुटाणे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाजप पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून अश्वमेध पाणलोट संस्था पदाधिकारी व राहुल श्रीराव यांनी चोख भूमिका पार पाडली.