परतवाडा : येथील राहुल व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित सिध्दार्थ विद्यालय व कनिष्ठ़ महाविद्यालय तथा एम.सी.व्ही.सी विभागाच्या हीमांशु नान्हे व प्रतिक नान्हेची राज्यस्तरावरील खेळ स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
हीमांशु नान्हे पाच हजार मिटर पायी चालणे व प्रतिक नान्हेची उंच उडी मध्ये स्व़.वसंत देसाई स्टेडीयम अकोला येथे विभागीय स्तरावर झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त़ केला. या दोन्ही मुलांची चंद्रपुर जिल्हयातील बल्लारपुर येथे होणा-या राज्य़ स्त़रावर होणा-या क्रीडा स्पर्धाकरीता निवड करण्यात आली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती तथा जिल्हा क्रीडा परिषद अमरावती द्वारे जिल्हा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाने विभागीय स्तरावर विजयी होऊन जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष मधुकरराव अभ्यंकर, सचिव क्षितीज अभ्यंकर, सहसचिव गजाननराव वानखडे, प्रा.शुभांगी ढेपे व प्राचार्य दिनेश मोहोड यांनी अभिनंदन केले.