पथ्रोट : दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे महत्व अधिक असते. पूजेबरोबरच घराला तोरण हे झेंडूच्या फुलांचे असते. वाहनांना देखील झेंडूच्या फुलांचे हार घालत असतात. त्याच पार्श्वभूमीवर झेंडू उत्पादक शेतकरी हे दसऱ्याच्या तोंडावर फुलं बाजारात पाठवितात. हवामान बदलाचा परिणाम फुलांवर झाला असूनही आवक वाढल्यामुळे यंदा झेंडूच्या फुलांचे दर घसरले आहेत. फुलांचे भाव घाऊक बाजारात २० रूपये प्रति किलो असून, किरकोळ विक्री ३० ते ३० रुपये किलो या प्रमाणे झेंडूची विक्री केली जात आहे.
नवरात्र उत्सव असलेल्यामुळे सध्या फुलांना चांगली मागणी असुन जिल्ह्यासह नांदेड, मध्यप्रदेशातील शेतकर्यांनी फुले विक्री साठी परतवाडा, अंजनगाव बाजारात पाठवली आहेत. झेंडूसह शेवंती, गुलछडी या फुलांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले. आवक मोठ्या प्रमाणात असलेल्यामुळे दर कमी झाले आहे. फुलांचे आडते म्हणाले, यंदा झेंडूचे उत्पादन जास्त झाल्याने मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गणेशोत्सवात फुलाला दर न मिळाल्याने दसर्याला दर मिळेल या अपेक्षेने अनेक शेतक:यांनी फुलांचे प्लाट राखून ठेवले होते. मात्र यंदा जास्तीचे उत्पादन आणि ऑक्टोबर हिट यामुळे बाजारात दाखल झालेल्या झेंडूच्या फलांपैकी 50 टक्के फुलांचा दर्जा खराब झाला आहे. मात्र, आवक जास्त असल्याने झेंडूला दर कमी मिळत आहे.