कारच्या धडकेत दोघे जखमी

26 Oct 2023 19:28:04
 
car-collision-leaves-two-injured-amravati - Abhijeet Bharat
 
अमरावती : भरधाव कारने दुचाकीला धडकेत दिल्याने दोघे जखमी झाले, तर त्याच एका दुसर्या कारचेही नुकसान झाले. ही घटना वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दर्यापूर फाट्यावर 22 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये अकोला येथील फार्मशिस्ट अंकीत संतोष लांडगे (23) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी आरोपी कार चालक प्रदिप आसारामसिंह जाधव (55, रा. पदमसौरभ कॉलनी) याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
 
फार्मशिस्ट अंकित लांडगे हे त्यांचे मित्र योगेश देशमुख, जय गिलबिले, अविनाश काबळे व शुभम भगत यांच्यासोबत कार क्रमांक एमएच 30 एझेड 0648 ने अमरावती येथील अंबा देवी दर्शनासाठी जात होते. दरम्यान दुपारी 1 वाजताच्या सुमारास ते वलगाव मार्गाने अमरावतीकडे येत असताना, त्यांच्या कारसमोर एक दुचाकी होती. दरम्यान एक दुसरी कार भरधाव वेगाने एसटी बसला ओव्हरटेक करीत पुढे आली आणि त्या कारने एमएच 27 सीएस 0114 या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडून जखमी झाले.
Powered By Sangraha 9.0