अमरावती : आमदार प्रविण पोटे यांनी आगग्रस्त कुटूंबाला आर्थिक मदत केली. बेलपुरा या भागामधील निवासी असणाऱ्या बबन दुबेकर कुटुंबियाच्या घरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे त्यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच आ.प्रविण पोटे यांनी तातडीने दुबेकर कुटूंबियांची भेट घेऊन त्यांना १० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. तसेच १ महीन्याचे रेशन दिले. सोबतच दुबेकर कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.यावेळी जयंत डेहणकर, सतिष करेसिया, अनिता राज, कौशिक अग्रवाल, धनंजय भुजाडे, नूतन भुजाडे, राधा कुरील, श्रीकांत धानोरकर , ऋषीकेश देशमुख, लखन राज, राजू कुरील, यश शर्मा, अखिलेश राठी, यश पटवा, प्रवीण रुद्रकार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.