नागपूर : नगर परिषद संचालनालयांतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा-2023 करीता घेतल्या जाणाऱ्या परीक्षा 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी केले आहे.
या परीक्षा सार्वजनिक स्वरूपाची असल्याने याबाबत समाजाची संवेदनशीलता लक्षा घेऊन नागपूर जिल्ह्याचे ग्रामीण क्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये याकरीता फौजदारी प्रक्रीया संहिता, 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये आदेश जारी करण्यात आले आहे. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील.