Mumbai : कांदिवलीतील इमारतीत अग्नितांडव; २ जणांचा मृत्यू, ३ जखमी

23 Oct 2023 16:16:18
 
fire-incident-kandivali-mumbai-2-dead-3-injured - Abhijeet Bharat
 
मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील एका इमारतीला आज भीषण आग लागल्याची घटना घडली. कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील पवन धाम वीणा संतूर या बहुमजली इमारतीला आज आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम भागातील पवन धाम वीणा संतूर इमारतीमध्ये आज दुपारी १२.२७ वाजताच्या सुमारास अग्नितांडव सुरु झाले. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या घटनास्थळी मुलींचे काम सुरु आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Powered By Sangraha 9.0