पूर्ती सुपर बाजारचा ग्राहकांसाठी 'फेस्टिव्हल धमाका'; सोन्याची नाणी आणि 4500 वस्तू जिंकण्याची संधी

21 Oct 2023 17:58:39
  • लक्ष्मीनगर शाखेत मुली-महिलांसाठी रेडीमेड गारमेंट्सचा नवीन विभाग 
purti-supermarket-festival-extravaganza - Abhijeet Bharat
 
नागपूर : गेल्या 25 वर्षांपासून नागपूरच्या चोखंदळ ग्राहकांच्या सर्व गरजा भागविणारे आणि सहकार तत्वावर आधारीत असलेलले पुर्ती सुपर बाजार हे नागपूरचे पहिल्या क्रमांकाचे सुपर बाजार आहे. त्वरित सेवा आणि उत्कृष्ट गुणवत्तेच्या वस्तू ग्राहकांना वाजवी किमतीवर वितरित करण्याचे काम पूर्ती सुपर बाजार चोख आणि नियमित करीत आहे. दरवर्षी उत्सवांच्या काळात आपल्या ग्राहकांसाठी खास योजना घेऊन येणाऱ्या पूर्ती सुपर बाजारने यंदाच्या सणासुदीच्या काळासाठी 'फेस्टिव्हल धमाका' योजना सुरु केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना सोन्याची नाणी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन या सारख्या 4500 पेक्षा अधिक वस्तू ग्राहकांना जिंकता येणार आहे. ही योजना 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वैध असेल. ग्राहकांना 3 हजार रुपयांच्या खरेदीवर स्क्रॅच कार्ड मिळेल आणि कार्डवर नमूद असलेली भेटवस्तू त्यांना लगेच जिंकता येईल, अशी माहिती पुर्ती सुपर बाजाराचे अध्यक्ष रवी बोराटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
या उत्सवाच्या हंगामात पूर्तीच्या दोन्ही शाखांमध्ये एका अद्वितीय उत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रंगीबेरंगी रंगोळ्या, आकर्षक दिवे, आकाशकंदील, होम डेकोरच्या वस्तू, उच्च दर्जाचे ड्रायफ्रुट बॉक्सेस, क्रॉकरी, भेटवस्तू आणि इतर उपयुक्त वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहे.
 
हेही वाचा : पूर्ती सुपर बाजारचा भागीदार कोणी एक नाही, तर तुम्ही सर्वजण आहात - नितीन गडकरी
 
पूर्ती कायमच ग्राहकांच्या मागणीनुसार विविध वस्तू सादर करण्याचा प्रयत्न करत असते. अलीकडेच पूर्तीच्या लक्ष्मीनगर शाखेत लेडीज कुर्ती आणि कपडे विभाग सुरू केले आहे. सुंदर डिझायनर एथनिक कुर्ती आणि सलवार सूट याठिकाणी उपलब्ध आहे. कुर्ती पॅटर्न टॉप्स आणि सलवार सूट व्यतिरिक्त पूर्तीच्या मनीष नगर शाखेत महिला आणि मुलांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सुती कापडापासून तयार केलेल्या वेस्टर्न आउटफिट्सची श्रेणी देखील उपलब्ध आहे. हे कपडे नवीनतम ट्रेंड लक्षात घेऊन आघाडीच्या डिझायनर्सनी तयार केले आहेत. नागपूरच्या गरम वातावरणात हे कपडे अतिशय आरामदायक आहेत. ते अगदी कमी किमतीत शुद्ध सुती कापडाचे बनलेले आहेत. हे कपडे, खेळणी, क्रॉकरी, घराच्या सजावटीच्या वस्तूंसह सर्वसामान्यांच्या खिशाला आणि मनाला आकर्षित करतात. ग्राहकांना ते नक्कीच आवडतील अशी खात्री पूर्ती सुपरबाजारचे अध्यक्ष रवी बोरटकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. याशिवाय मुलांचा खेळणी विभाग, ब्रँडेड क्रोकरी विभाग हे सर्व नवीन स्टॉक्सने भरलेला आहे.
 
ग्राहकांना या संधीचा फायदा घ्यावा आणि या दिवाळी खरेदीसाठी पूर्तीला भेट द्यावी, असे आवाहन पूर्ती तर्फे करण्यात आले आहे. यावेळी पुर्ती सुपर बाजाराचे अध्यक्ष रवी बोराटकर यांच्यासह सचिव राजीव हडप आणि कोषाध्यक्ष दिलीप सप्तरशी, संचालक केतकी कासखेडीकर आणि इतर संचालक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0