'चैतू'ची आई आता तरी त्याच्याशी बोलणार का?

21 Oct 2023 18:05:15
  • येत्या दिवाळीत नात्यांची नाळ अजून घट्ट होणार
  • पहिल्या भागाच्या आठवणींचा खजिना मोठा चैत्या पुन्हा उलगडणार
chaitus-mother-in-naal-2 - Abhijeet Bharat
 
नागपूर : प्रत्येकाच्या मनात घर करून गेलेला 'नाळ' हा मराठी चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नाळ' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशातच काही दिवसांपूर्वी ‘नाळ भाग २’ या चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित झाला होता. या टिझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
 
'नाळ'च्या पहिल्या भागात 'चैतू'ची आई त्याच्याशी न बोलताच निघून गेली. आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला जाणार आहे. मात्र आता इतकी वर्ष झाल्यानंतर त्यांच्यातील हा दुरावा निवळेल का? चैतू त्याच्या आईकडे येईल का? त्यांच्यातील हा अबोला संपेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतील. परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहेत. ‘नाळ भाग २’ चे दुसरे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून टिझरमध्ये चैतू आनंदाने त्याच्या आईबरोबर सायकलने जाताना दिसत आहे. मात्र त्यांच्या नात्याची नाळ जुळली आहे का, हे अद्यापही अनुत्तरित आहे. याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.
 
 
‘नाळ भाग २’ मधील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भिंगोरी’ गाणेही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ‘आई मला खेलायला जायचंय’ या गाण्याप्रमाणेच ‘भिंगोरी’ या गाण्याचे व्ह्यूजही दिवसेंदिवस वाढत आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित 'नाळ भाग २'चे सुधाकर रेड्डी यंक्कट्टी दिग्दर्शक आहेत. 'नाळ' ने प्रेक्षकांशी नाळ जोडली. राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. आता 'नाळ भाग २' लवकरच पहिल्या भागातील आठवणींचा खजिना मोठा चैतू पुन्हा उलगडणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत ही नात्यांची नाळ अधिकच घट्ट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0