- वाडीत वीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे अनावरण
वाडी :
भारतीय इतिहास महाराणा प्रताप यांच्या नावाने गुंजतो. मुघलांना छठीच्या दुधाची आठवण करून देणारा हा असा योद्धा होता. त्यांच्या पराक्रमाच्या गाथेचा भारत भूमीला अभिमान आहे, असे प्रतिपादन भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडीचे जिल्हाध्यक्ष मानसिंग ठाकूर यांनी केले. वाडी येथील उत्तर भारतीय समाज, क्षत्रिय बांधव यांच्या पुढाकाराने वसंत विहार कॉलनीतील सार्वजनिक मैदानात वीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रताप हे राजपूतांपैकी सिसोदिया घराण्याचे वंशज होते. ते एक शूर राजपूत होते. प्रत्येक परिस्थितीत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या प्रजेचे रक्षण केले. त्यांनी नेहमीच स्वतःच्या आणि कुटुंबातील लोकांचा आदर केला. असे एक राजपूत होते. ज्याच्या शौर्याला अकबरानेही सलाम केला होता. महाराणा प्रतापजी केवळ लढाऊ कौशल्यातच परिपूर्ण नव्हते तर ते एक उत्कट आणि धार्मिक व्यक्ती देखील होते, असे प्रतिपादन युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अश्विन बैस यांनी केले.
यावेळी अश्विन बैस, प्रमोद सिंह, बी. एन. सिंह, मानसिंग ठाकूर, अखिलेश सिंह, अर्जुन सिंग, प्रवीण सिंह, वीरेंद्र सिंह, जगदेव सिंह राणा, आकाश गायकवाड, सागर बैस, अनिकेत तितरमारे, विशाल सिंह उपस्थित होते.