आता काटोलात मिळणार दिव्यांग प्रमाणपत्र

20 Oct 2023 18:59:05
- दिव्यांग परिवाराला मिळाला दिलासा
- आता काटोल येथे दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार - सलील देशमुख
- ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग मंडळाला मंजुरी

now disability certificate will be available in katol
  
काटोल :
काटोल व नरखेड तालुक्यातील दिव्यांग बांधवाना नागपूर येथील मेयो रुग्णालयात जावे लागत होते. ती सेवा आता शहरात उपलब्ध झाल्याने दिव्यांग परिवाराचा प्रश्न सुटला असून आनंद व्यक्त केला आहे. काटोल शहरात दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व वितरण व्हावे याकरिता जिल्हा परिषद धडाडीचे युवा सदस्य सलील देशमुख यांनी पुढाकार घेतला. नागपूर ते मुंबई पर्यत सातत्यपुर्ण पाठपुरावा केल्याने काटोल येथील ग्रामिण रुग्णालयात दिव्यांग मंडळाला मंजुरी मिळाली असून आता अपंग प्रमाणपत्र हे काटोल येथेच मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद आरोग्य समीतीचे सदस्य सलील देशमुख यांनी दिली.
 
दिव्यांग बोर्ड सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव काटोल ग्रामिण रुग्णालयाच्या माध्यमातुन तयार करुन तो जिल्हा शल्यचिकत्सक यांना पाठविण्यात आला. जिल्हा शल्यचिकीत्यक यांचा अहवाल तयार करुन तो पुणे येथील दिव्यांग कल्याण मंडळ आयुक्तालय यांच्याकडे सादर करण्यात आला. दरम्यान हा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी सलील देशमुख यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर यांच्यासोबत मुंबई येथील मंत्रालयात भेटुन काटोल येथील ग्रामिण रुग्णालयामध्येच दिव्यांग बोर्डची परवानगी देण्याची मागणी लावुन धरली. तसेच दिव्यांग मंडळाला मंजुर देण्याची विनंती केली.
 
अखेर काटोल येथील ग्रामिण रुग्णालयात दिव्यांग मंडळाला मंजुर देण्यात आली आहे. यामुळे आता काटोल येथेच अपंगाचे प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया पुर्ण होईल. सध्या या संदर्भातील आयडी तयार झाला असून त्यासाठी संबधीत व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येथे हात, पाय तसेच डोळयांच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र तयार करण्याचे काम होणार आहे. यासाठीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर संबधीत तज्ञ वैद्यकीय चमु ठरावीक दिवशी उपस्थीत राहतील. ही सर्व प्रक्रीया होण्यासाठी साधरणात एक महीन्याचा कालावधी लागणार असुन दिव्यांग मंडळ लवकवरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती सुध्दा सलील देशमुख यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0