प्रोजेक्ट 15बीचे तिसरे जहाज 'इंफाळ' भारतीय नौदलाला सुपूर्द

20 Oct 2023 19:03:04
 
Indian Navy gets third guided missile destroyer Imphal 
 
मुंबई :
'इंफाळ' (Imphal) म्हणजे यार्ड 12706 हे प्रोजेक्ट 15बी वर्गातील गाईडेड मिसाईल प्रणालीयुक्त तिसरी विनाशिका माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) आज भारतीय नौदलाला सुपूर्द केली. एम डी एल चे अध्यक्ष आणि amp, व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल, रिअर ऍडमिरल संजय साधू, ए व्ही एस एम, एन एम, सी एस ओ (टेक), कमांडिंग ऑफिसर (डेझिगनेट) कॅप्टन के के चौधरी, एम डी एल चे संचालक, युद्धनौकेची देखरेख करणारी टीम (MB) आणि नौदलाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज एमडीएल इथे अधिग्रहण दस्तावेजांवर स्वाक्षरी करण्यात आली.
 
या जहाजाची बांधणी DMR 249A हे स्वदेशी पोलाद वापरून केली आहे आणि भारतात बांधलेल्या सर्वात मोठ्या विनाशिकेपैकी ही एक आहे, जहाजाची एकूण लांबी 164 मीटर आहे आणि तर वजन 7500 टन पेक्षा जास्त आहे. सागरी युद्ध क्षमतेचा विचार करता तसेच युद्धामधील विविध मोहिमा आणि डावपेच बघता हे जहाज लक्षणीयरीत्या सक्षम असे व्यासपीठ आहे. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे आणि मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या ‘बराक-8’ या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. 
 
समुद्राखालील युद्ध क्षमतेचा विचार करता यात स्वदेशी पाणबुडीविरोधी शस्त्रे आणि सेन्सर्स बसवलेले आहेत. विशेषत्वाने विनाशिकेच्या नांगरावर सोनार हम्सा एनजी, अवजड टॉर्पेडो ट्यूब लाँचर्स आणि एएसडब्लू रॉकेट लाँचर्स बसवले आहेत.
 
नौदलातील आधीच्या विनाशिका आणि युद्धनौकांच्या क्षमतांपेक्षा ही लक्षणीयरीत्या अधिक अष्टपैलू आहे. शत्रूच्या पाणबुड्या, पृष्ठभागावरील युद्धनौका, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांविरुद्ध इंफाळची सर्वांगीण क्षमता ही जहाजांच्या मदती शिवाय स्वतंत्रपणे कार्य करण्यास आणि नौदल कृती दलाचे प्रमुख म्हणून कार्य करण्यास ती सक्षम ठरेल.
 
'इंफाळ'ही आजपर्यंतची सर्वात अधिक लढाऊ क्षमतेची विनाशिका असून ती करारातील वेळेच्या चार महिने आधीच भारतीय नौदलाला देण्यात आली आहे. हे एम डी एल च्या कार्यातील सातत्यपूर्ण सुधारणा आणि जागतिक मानदंडांच्या तोडीस तोड कार्य करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या जहाजाने ०३ सीएसटी (कॉन्ट्रॅक्टर्स सी ट्रायल) मध्ये पहिल्याच सीएसटीमध्ये प्रमुख शस्त्रास्त्रांच्या फैरींसह सर्व सागरी चाचण्या पूर्ण केल्या आहेत. हे जहाज सर्व P15B जहाजांपैकी पहिले जहाज आहे ज्यामधील अधिक सुधारित अशा ब्राह्मोस क्षेपणास्त्रांमध्ये लांब पल्ल्याची आणि जमिनीवर हल्ला करण्याची दुहेरी भूमिका निभावण्याची क्षमता आहे. तसेच इंफाळ ही पहिली नौदल युद्धनौका आहे ज्यामध्ये महिला अधिकारी आणि खलाशांच्या निवासाची सोय आहे.
 
ही विनाशिका एकूण 312 कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ शकते, त्याची क्षमता 4000 नॉटिकल मैल आहे आणि ती नियोजित मोहिमेपेक्षा विस्तारित मोहिम वेळेसह ठराविक 42 दिवसांची मोहीम पार पाडू शकते. विनाशिकेची पोहोच आणखी वाढवण्यासाठी त्यावर दोन हेलिकॉप्टर आहेत. जहाज एका शक्तिशाली कम्बाइंड गॅस अँड गॅस प्रोपल्शन प्लांट (COGAG) द्वारे चालवले जाते, ज्यामध्ये चार उलट करता येण्याजोग्या गॅस टर्बाइनचा समावेश आहे, ज्यामुळे तिला 30 नॉटिकल मैल (अंदाजे 55 किमी प्रतितास) पेक्षा जास्त वेग गाठता येतो.गीगाबाइट इथरनेट आधारित शिप डेटा नेटवर्क (जीईएसडीएन), युद्ध व्यवस्थापन प्रणाली (सीएमएस), ऑटोमॅटिक पॉवर मॅनेजमेंट सिस्टम (एपीएमएस) आणि इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (आयपीएमएस) यासारख्या अत्याधुनिक डिजिटल नेटवर्कसह विनाशिकेत उच्च दर्जाची ऑटोमेशन व्यवस्था आहे.
 
पी15बी वर्गाच्या विनाशिकेत 72% स्वदेशी सामग्री आहे. तिच्या पूर्वसुरींच्या म्हणजेच पी15ए (59%) आणि पी15 (42%) यांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे. यावरुनच सरकार ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावर आणि उप विक्रेत्यांच्या परिसंस्थेचा विकास करण्यावर किती भर देत आहे लक्षात येते.
 
पी15बी (विशाखापट्टणम) ही पहिली विनाशिका गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर 2021 रोजी कार्यान्वित झाली. पी15बी (विशाखापट्टणम) ही पहिली विनाशिका गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर 2021 रोजी कार्यान्वित झाली.तिसरी विनाशिका (इम्फाळ) जलावतरण 20 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली आणि चौथ्या विनाशिकेचे (सुरत) जलावतरण 17 मे 2022 रोजी करण्यात आले होते आणि ते आउटफिटिंगच्या पुढील टप्प्यावर आहे.
 
देशाच्या प्रगतीशील स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुडी निर्माण कार्यक्रमात एमडीएल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. लिअँडर आणि गोदावरी क्लास फ्रिगेट्स, खुकरी क्लास कॉर्वेट्स, मिसाईल बोट्स, दिल्ली आणि कोलकाता क्लास विनाशिका, शिवालिक क्लास स्टेल्थ फ्रिगेट्स, विशाखापट्टनम क्लास विनाशिका, निलगिरी क्लास फ्रिगेट्स, एसएसके पाणबुड्या आणि पाच स्कॉर्पीन पाणबुड्यांची निर्मिती एमडीएलने केली आहे. आधुनिक काळातला एमडीएलचा इतिहास, हा जणू भारतातील स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुडी बांधणीचाच इतिहास आहे. त्यामुळेच, ‘भारतीय युद्धनौका आणि पाणबुडीचे शिल्पकार’ अशी सार्थ उपाधी त्यांनी संपादन केली आहे.
Powered By Sangraha 9.0