अंश पार्डीकर, दक्ष लोखंडे व मल्हार कानगो व‍िजेते‍

    16-Oct-2023
Total Views |
  • स्वर्गीय गिरीजाबाई शेळके स्मृती आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे पारितोषिक व‍ितरण
ansh-pardekar-daksh-lokhande-malhar-kanago-winners-girijabai-shelke-memorial-storytelling-competition - Abhijeet Bharat 
नागपूर : स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ व बाल कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. गिरीजाबाई शेळके स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय कथाकथन स्पर्धा श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथील सुंदराबाई साने सभागृहात शुक्रवारी पार पडली. तीन गटात झालेल्‍या या स्‍पर्धेत अंश पार्डीकर, दक्ष लोखंडे व मल्हार कानगो व‍िजेते‍ ठरले.
 
गट अ वर्ग 1 ते 5 मध्ये विभा गांधी हायस्कूलच्‍या अंश पार्डीकरचा प्रथम क्रमांक आला. सोमलवार हायस्कूलची भार्गवी नरड हिने द्वितीय, तर केशव नगर हायस्कूल शिवस्वी बागडेने तृतीय क्रमांक पटकावला. उतेजनार्थ पार‍ितोष‍िक स्वरा सहस्त्रबुधे व मोहन बावनकर यांनी पटकावले. सर्वात लहान स्‍पर्धक निकुंज राठी व विद्याश्री झोलेकर यांनाही बक्ष‍िस देण्‍यात आले. ब गटात प्रथम क्रमांक केशवनगर हायस्कूलच्‍या दक्ष लोखंडेने पटकावला. द्वितीय क्रमांक आर. एस. मुंडले हायस्कूलची शाम्भवी देशमुख, तर तृतीय क्रमांक सेवासदन हायस्कूलच्‍या आसावरी खरात ह‍िने पटकावला. उतेजनार्थ पार‍ितोषिक जान्हवी देशमुख व आराध्य हरडे यांना देण्‍यात आले. गट क मध्ये सोमलवार हायस्‍कूलचा मल्हार कानगो व‍िजयी ठरला. द्वितीय क्रमांक ओवेल हायस्कूलची सृष्‍टी झोडे तर तृतीय क्रमांक सेवासदन हायस्कूलची वैशाली कोळपे ह‍िने पटकावला. उतेजनार्थ पार‍ितोष‍िक धनश्री पौनीकर व आर्या गिरडे यांनी पटकावला.
 
पारितोष‍िक कार्यक्रमाला स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, बाल कला अकादमीच्या अध्यक्ष मधुरा गडकरी यांची उपस्‍थ‍िती होती. कार्यक्रमाला भीमराव शेळके व शोभा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेला परीक्षक म्हणून अनिल देव व शरयू चितळे यांनी काम पाह‍िले. अध्यक्षांच्या प्रतिनिधी सीमा फडणवीस, शाळेच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे यांची उपस्‍थ‍िती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्नेहल इंगळे यांनी केले.