Navratri 2023 : नवरात्रीचे ९ दिवस आणि ९ रंगांचे महत्व

14 Oct 2023 10:00:00
 
navratri-2023-significance-of-nine-days-and-nine-colors - Abhijeet Bharat
 
नागपूर : नवरात्र हा मुळात संस्कृत शब्द आहे, याचा अर्थ 'नऊ रात्र ' असा होतो. ९ दिवसांचा हा उत्सव संपूर्णतः देवी दुर्गाच्या पूजेसाठी समर्पित असतो. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. भारतात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. चैत्र नवरात्र ही एप्रिल- मे महिन्यात येते, तर शारदीय नवरात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात साजरी केली जाते. यापैकी शारदीय नवरात्र ही संपूर्ण भारतात मोठी नवरात्र म्हणून ओळखली जाते. या नऊ दिवसांच्या उत्सवात प्रत्येक दिवशीच्या ९ रंगांना विशेष महत्व आहे. चला तर मग जाणून घेऊया या रंगांच्या महत्वाबद्दल...
 
navratri-2023-significance-of-nine-days-and-nine-colors - Abhijeet Bharat
 
दिवस १ : केशरी रंग
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ऑरेंज/ केशरी रंग परिधान करावा. ऑरेंज रंग हा उबदारपणा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतिक मानला जातो. त्यामुळे या दिवशी देवीची पूजा करताना ऑरेंज रंग परिधान करावा.
 
दिवस २ : रंग पांढरा
नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आहे. आजचा पांढरा रंग परिधान करण्याचा दिवस आहे. पांढरा रंग हा शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक असलेल्या याला विशेष महत्व असते.
 
दिवस ३ : रंग लाल 
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लाल रंग परिधान करावा. शुभ, सौंदर्य आणि निर्भयतेचे प्रतिक असलेला लाल रंग देवीला प्रिय आहे. याशिवाय लाल रंगला उत्साह आणि प्रेमाचे प्रतीकही मानले जाते.
 
दिवस ४ : रॉयल ब्लु रंग
नवरात्रीच्या सर्व रंगांमध्ये रॉयल ब्लु रंग हा सर्वात लोकप्रिय आहे. हा रंग आरोग्य आणि संपत्तीवर्धक असतो, असे मानले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीचे पूजन करत असताना हा रंग परिधान करून देवीला प्रसन्न करता येते.
 
दिवस ५ : पिवळा रंग
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी यंदा पिवळा रंगाचे वस्त्र परिधान करावा. पिवळा रंग हा तेज, आनंद आणि उत्साहाचा रंग असल्यामुळे देवीला प्रिय आहे. याशिवाय हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे.
 
दिवस ६ : हिरवा रंग
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी यंदा हिरव्या रंगाचे महत्व आहे. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतिक आहे. तसेच हा रंग सौभाग्य, प्रकृती, विकास आणि स्थिरतेचे प्रतिनिधित्व करतो.
 
दिवस ७ : रंग राखडी
नवरात्रीच्या सातव्या दिवशी ग्रे (राखडी) रंग परिधान करावा. राखडी रंग नवरात्रीच्या सर्व नऊ रंगांपैकी शांत आणि शुद्ध रंग असून याला बुद्धिमत्तेचे प्रतिकही मानले जाते. याशिवाय हा रंग एखाद्या व्यक्तीच्या साधेपणाचे लक्षण दर्शवतो.
 
दिवस ८ : जांभळा
नवरात्रीच्या आठव्या दिवशी यंदा जांभळ्या रंगाचे महत्व आहे. हा रंग भव्यता आणि राजेशाहीचे प्रतीक दर्शवतो. या दिवशी जांभळा रंग परिधान करून देवी महागौरीची पूजा केल्यास सुख-समृद्धी लाभते.
 
दिवस ९ : मोरपंखी रंग
नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे महानवमी. या दिवशी देवीची पूजा करताना मोरपंखी (Peacock Green) रंगाचे महत्व आहे. मोरपंखी रंग हा विशिष्टता आणि व्यक्तिमत्व सूचित करतो. तसेच हा रंग करुणा आणि ताजेपणाचा प्रतिक आहे. त्यामुळे देवीची पूजा करताना मोरपंखी रंग परिधान करावा.
Powered By Sangraha 9.0