गुरू प्रसाद प्राथमिक शाळेची वृक्षसंवर्धन प्रभात फेरी

13 Oct 2023 13:52:18
 
tree-conservation-cleanliness-drive-morning-assembly-guru-prasad-primary-school - Abhijeet Bharat
 
वाडी : दत्तवाडी येथील गुरू प्रसाद प्राथमिक शाळेची वृक्षसंवर्धन व स्वच्छता अभियान अंतर्गत शालेय प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगी व घोषवाक्ये लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. झाडे तर लावले, परंतु त्या झाडाचे वृक्षसंवर्धन होणे गरजेचे आहे. या विषयी नागरीकांना वृक्षसंवर्धन हेतूने व स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचे महत्त्व समजावे यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भोले शंकर शैक्षणिक संस्था व शिवशक्ती शैक्षणिक संस्थेचे सचिव नारायणराव घोडखांदे यांनी दिली.
 
अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी घोडखांदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिवशक्ती शैक्षणिक संस्थेच्या संचालिका मिनाक्षी घोडखांदे, सदस्य विनय घोडखांदे, नागपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय तायवाडे, गुरू प्रसाद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा चौधरी उपस्थित होते. यावेळी नरेश नगराळे, श्रद्धा देशभ्रतार, विशाखा चनेकर, मिना बावणे, सरोज घोडखांदे, अरविंद उईके, रंजना काळे, शिला चोपडे, प्रणिता कुथे, माधुरी पोहनकर, निलीमा ईखार, कर्मचारी रिना फुलसुंगे, राशी मंडपे कार्यक्रमात सहभागी झाले.
Powered By Sangraha 9.0