विधानसभा निवडणुकीपूर्वी नक्षलवाद्यांचा मोठा कट फसला; जवानांकडून आयईडी जप्त

    11-Oct-2023
Total Views |
 
naxal-surrenders-state-elections-id-recovered-youth - Abhijeet Bharat
 
सुकमा : भारतीय निवडणूक आयोगाने नुकतीच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून त्यासंबंधित वेळापत्रकही जाहीर केले आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये या निवडणूक होणार असून राज्ये निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराममध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान १७ नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलमपल्ली परिसरात जवानांनी आयईडी जप्त केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, जवानांना इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने आयईडी पेरण्यात आला होता. पण, नक्षलवाद्यांचा हा डाव जवानांनी हाणून पाडला आहे. सर्चिंगवर असलेल्या सीआरपीएफच्या 74 व्या बटालियन आणि डीआरजीने ही कारवाई केली आहे. तपास करत असताना जवानांनी आयईडीचा स्फोट करून घटनास्थळी उद्ध्वस्त करण्यात आला. सर्व जवान सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. एसपी किरण चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.