World Braille Day: कोण होते लुई ब्रेल? का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती

    04-Jan-2023
Total Views |
 
world braille day 2023
 (Image Source : Internet/representative)
 
नागपूर:
 
संपूर्ण जगात ४ जानेवारी हा दिवस 'world braille day' म्हणजेच जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फ्रेंच शिक्षक लुई ब्रेल यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाते. पण अनेकांना या दिवसा मागील संकल्पना माहिती नाही. चला तर जाणून घेऊ या दृष्टिहीन लोकांना ब्रेल लिपीची भेट देणारे लुई ब्रेल यांची संपूर्ण माहिती.
 
कोण होते लुई ब्रेल?
लुई ब्रेल यांचे वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी एका दुर्घटनेत डोळ्यांना दुखापत झाली. या दुर्घटनेमुळे लुईला आपली दृष्टी पूर्णपणे गमवावी लागली. या अपघातानंतर लुई ब्रेल यांनी हार न मानता आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या आणि आपल्यासारख्या दृष्टिहीन लोकांसाठी लुईने ब्रेल लिपी निर्माण केली. ज्याच्या परिणामस्वरूप आज जगभरातील दृष्टिहीन व्यक्तींना सुशिक्षित होण्यास मदत मिळत आहे.
 
काय आहे ब्रेल लिपी:
ब्रेल एक अशी प्रणाली आहे. ज्याच्या मदतीने प्रत्येक अक्षर आणि संख्येसाठी सहा ठिपके तसेच संगीत, गणितीय आणि वैज्ञानिक चिन्हे वापरून वर्णमाला आणि संख्यात्मक चिन्हांचे स्पर्शिक प्रतिनिधित्व केले जाते. ज्याच्या मदतीने दृष्टिहीन लोकांना अक्षरे समजण्यास मदत होते.
 
 
world braille day 2023
 
ब्रेल प्रणालीची काही विशेषतः:
  • World Braille Usage च्या तिसऱ्या आवृत्तीनुसार ब्रेल कोड हे १३३ भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
  •  ब्रेल ही कुठली भाषा नसून, ती स्पर्शिका चिन्हांची एक प्रणाली आहे, ज्यामध्ये सेलमध्ये उभारलेले ठिपके असतात. या सेलमध्ये तीन पंक्ती आणि दोन स्तंभांचा मॅट्रिक्स असतो.
world braille day इतिहास:
जागतिक अंध संघ (WFBD) द्वारे जानेवारी २००२ मध्ये जगातील ब्रेल दिन प्रथम स्थापित करण्यात आला होता. ४ जानेवारी १८०९ मध्ये जन्मलेल्या लुई ब्रेलच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केल्या जातो. ब्रेल ही एक अशी प्रणाली आहे ज्याच्या मदतीने दृष्टिहीन लोक बोटांच्या मदतीने स्पर्श करून वाचन करतात. दृष्टिहीन लोकांसाठी साक्षरता आणि शिक्षण सुधारण्यासाठी हे एक महत्वपूर्ण साधन आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.