देशातील पहिल्या हरित हायड्रोजन(H2) मिश्रण प्रकल्पाची येथे सुरुवात

    04-Jan-2023
Total Views |
ntpc
image source pib

नवी दिल्‍ली:
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC)ने भारताचा पहिला ग्रीन (हरित) हायड्रोजन मिश्रण प्रकल्प सुरु केला आहे. सूरतमधील एनटीपीसी कावस टाउनशिप च्या, पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) नेटवर्कमध्ये हरित हायड्रोजनचे मिश्रण सुरू करण्यात आले. हा प्रकल्प एनटीपीसी आणि गुजरात गॅस लिमिटेड (जीजीएल) यांचा संयुक्त उपक्रम आहे.
आतापर्यंत युके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इत्यादी मोजक्या देशांनीच ही कामगिरी केली आहे. ती भारताला जागतिक हायड्रोजन अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणेल. यामुळे भारत केवळ हायड्रोकार्बनच्या आयातीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करणार नाही, तर जगाला हरित हायड्रोजन आणि हरित रसायने निर्यात करणारा देश बनून, परकीय चलन मिळणार आहे. मागील वर्षी ३० जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती, त्यानंतर एनटीपीसी आणि जीजीएलने विक्रमी वेळेत हा टप्पा गाठला.
 
 
 
आदित्यनगर, सूरत येथील कावस टाऊनशिपमधील घरांना H2-NG (नैसर्गिक वायू) पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प सज्ज आहे. कावसमधील हरित हायड्रोजन यापूर्वीच स्थापित केलेल्या 1 मेगावॅटच्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामधील वीज वापरून पाण्याचे विद्युत अपघटन करून निर्माण केला जातो.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (पीएनजीआरबी) या नियामक संस्थेने सुरुवातीला for 5% vol./vol हरित हायड्रोजनच्या पीएनजी बरोबर मिश्रणाला परवानगी दिली आहे आणि टप्प्याटप्प्याने मिश्रणाची पातळी वाढवून २० टक्के केली जाईल. हरित हायड्रोजनचे जेव्हा नैसर्गिक वायू बरोबर मिश्रण केले जाते, तेव्हा तो उष्मादायकता तेवढीच ठेवून, कार्बन उत्सर्जन कमी करतो.