Digital India: डिसेंबर महिन्यात ७८२ कोटी UPI व्यवहार

    03-Jan-2023
Total Views |
  
782 crore upi transactions in the month of december 2022
 (Image Source : Internet/representative)
 
नवी दिल्ली:
 
अत्याधुनिक युगात भारत देखील अत्याधुनिक होता चालला आहे. भारतीय नागरिक डिजिटल होत चालले आहेत. भारताने मागील डिसेंबर २०२२ मध्ये १२. ८ लाख कोटी रुपयांचे ७८२ कोटी यूपीआय व्यवहार पूर्ण करीत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
 
 
डिजिटल आर्थिक व्यवहारांचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर केल्याबद्दल भारतीय नागरिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. अर्थक्षेत्रातील तंत्रज्ञानविषयक तज्ञाचा ट्विट संदेश सामायिक करून,पंतप्रधान त्यांच्या ट्विट संदेशात म्हणाले;
 
 
'तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने भारतात यूपीआय प्रणालीला वाढत्या प्रमाणात लोकप्रिय केले आहे ते मला फार भावले. डिजिटल भरणा पद्धतीचा स्वीकार केल्याबद्दल मी माझ्या सहकारी भारतीयांचे कौतुक करतो. तंत्रज्ञान आणि अभिनव संशोधन प्रती त्यांनी उल्लेखनीय स्वीकारार्हता दाखवली आहे.'
 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.