गौहर खान नव्या वर्षात करणार नवीन प्रवासाची सुरुवात; चाहत्यांना दिली ही खास बातमी

03 Jan 2023 18:40:48

actress gauhar khan announces her pregnancy
  (Image Source : Instagram/gauaharkhan)
 
मुंबई :
 
अभिनेत्री गौहर खान आणि कोरिओग्राफर झैद दरबार २ वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले. २५ डिसेंबर २०२० रोजी लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेलेले गौहर आणि झैद यांनी आपल्या नव्या जीवनाची सुरुवात केली. अशात नवीन वर्षाच्या सुरुवातीला गौहरने तिच्या चाहत्यांबरोबर आणखी एक खास बातमी शेअर केली आहे.
 
actress gauhar khan announces her pregnancy
  (Image Source : Instagram/gauaharkhan)
 
नव्या वर्षात गौहर खान तिच्या आयुष्यातील एका सर्वात सुंदर आणि महत्वाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. अभिनेत्री लवकरच आई बनणार आहे. गौहरने नुकतीच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.

actress gauhar khan announces her pregnancy
 (Image Source : Instagram/gauaharkhan)
 
अभिनेत्रीने लवकरच आई बनण्याचा आनंद जाहीर करताना तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.


 
या फोटोमध्ये गौहर आपला बेबी बंप दाखवत अत्यंत आनंदी असल्याचे दिसत आहे.
 
actress gauhar khan announces her pregnancy
  (Image Source : Instagram/gauaharkhan)
 
तसेच काही दिवसांपूर्वी गौहरने पती झैदबरोबर त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून ही आनंदाची बातमी एका वेगळ्या पद्धतीने चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
 
 
 
यात व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, गौहर आणि झैद भेटले तेव्हा ते एकाचे दोन झाले. आता आम्ही लवकरच दोनाचे तीन होणार आहोत.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
Powered By Sangraha 9.0