पंतप्रधान मोदी करिअप्पा मैदानावर एनसीसी पीएम रॅलीला करणार संबोधित

    27-Jan-2023
Total Views |

PM Modi to Address NCC PM Rally at Cariappa Maidan
 (Image Source : Internet/representative)
 
 
नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi to Address NCC PM Rally at Cariappa Maidan) शनिवारी दिनांक २८ जानेवारी रोजी संध्याकाळी सुमारे ०५:४५ वाजता नवी दिल्ली येथील करिअप्पा परेड ग्राउंडवर वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला संबोधित करतील.
 
यंदा एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) आपल्या स्थापनेचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान (PM Modi to Address NCC PM Rally at Cariappa Maidan) एनसीसीच्या ७५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या स्मरणार्थ विशेष 'डे कव्हर' आणि खास घडवण्यात आलेले रुपये ७५ मूल्याचे नाणे जारी करतील.
 
दरम्यान दिवस-रात्रीची एक रॅली (PM Modi to Address NCC PM Rally at Cariappa Maidan) आयोजित केली जाईल, ज्यामध्ये ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम असतील. 'वसुधैव कुटुंबकम' या भावनेला अनुसरून, १९ देशांमधील १९६ अधिकारी आणि कॅडेट्सना या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.