देश बलशाली होईल!

    26-Jan-2023
Total Views |

India will be strong
 (Image Source : Internet/ Representative image)
 
स्वातंत्र्य दिन (Independence Day) आणि प्रजासत्ताक दिन (Republic Day) हे आपले दोन राष्ट्रीय सण आहेत. हे दोन्ही सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण या दिवशी तिरंग्याला मानवंदना देऊन देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतात; पण दुर्दैवाने अनेक लोकांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन यातील फरक सांगता येत नाही. (Republic Day)
 
भारताला ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. देश स्वातंत्र्य झाला तेव्हा आपल्या देशाला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. स्वतंत्र देशाला स्वतःचे संविधान असावे. त्या संविधानात देशाचा कारभार कसा चालवायचा या संबंधी नियम आणि कायदे असावेत, तसेच नागरिकांचे हक्क आणि कर्तव्याचा देखील त्यात समावेश असावा असे सर्वांचे मत होते. हे संविधान तयार करण्याचे शिवधनुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या विद्वानाने पेलावे, असे आव्हान करण्यात आले. तेव्हा ते संविधान तयार करण्याचे आव्हान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले. (Republic Day)
 
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात समिती नेमण्यात आली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवस खुला केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या नेतृत्वाखालील या समितीने २ वर्ष ११ महिने १८ दिवसात संविधानाचा मसुदा तयार केला. बरेचसे विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर २४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्यांनी हा मसुदा मान्य केला. (Republic Day)
 
संविधानाच्या दोन हसलिखित प्रति तयार करण्यात आल्या. इंग्रजी व हिंदी भाषेत या प्रति होत्या. दोन दिवसांनी म्हणजे २६ जानेवारी १९५० पासून या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. संविधानेने आपल्याला मूलभूत हक्कांसोबत मूलभूत कर्तव्ये देखील दिली आहेत. हक्क आणि कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण जितके हक्कांबाबत जागरूक असतो तितके आपण आपल्या कर्तव्याबाबत जागरूक नसतो. जर प्रत्येक नागरिकाने आपल्या संवैधानिक हक्कांसोबत संवैधानिक कर्तव्ये देखील प्रामाणिकपणे बजावली तरच भारत बलशाली होईल.
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.