भाईजानचा नवा लूक बघितला का? 'किसी का भाई किसी की जान' चा टिझर रिलीज

    25-Jan-2023
Total Views |

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
 
मुंबई :
बॉलिवूडचा भाईजान अर्थातच मेगास्टार सलमान खान आपल्या आगामी चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धमाल करण्यास सज्ज झाला आहे. सलमान खानचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' ची (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) घोषणा झाल्यापासून चाहते याची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. तसेच या चित्रपटाच्या टिझरची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावरही सर्वत्र टिझरबद्दल चर्चा सुरु होती. इतकेच नाही तर या चित्रपटातील सलमान खानची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अशातच, आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला असतानाच निर्मात्यांनी अखेरीस या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे. हा टिझर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.
 
टिझरची सुरुवात सलमानच्या 'सही का होगा सही, गलत का होगा गलत' या डायलॉगने होत असून यामध्ये सलमान खानचा सिग्नेचर स्वॅग पाहायला मिळेल. तसेच, या टिझरमध्ये 'वैसे मेरा कोई नाम नहीं, पर में भाईजान के नाम से जाना जाता हूं' यांसारख्या लाईन्स आणि असे काही क्षण तसेच डायलॉग्स आहेत, जे येत्या काळात सामान्य भाषेचा एक मुख्य भाग नक्कीच बनतील. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan)


सलमान खानचे चित्रपट रिलीज नेहमीच एका मेगा फेस्टिव्हलसारखे असतात. अशातच, ईदच्या खास मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात प्रत्येकासाठी काही ना काही आहे, ज्यामुळे हा एक परफेक्ट फॅमिली एंटरटेनर बनतो.
 
सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.