National Tourism Day: भारतातील 'ही' ठिकाणे आपल्या सौंदर्याने आश्चर्यचकित करणारी

    25-Jan-2023
Total Views |

national tourism day 2023
 (Image Source : Internet)
 
 
नागपूर:
संपूर्ण जगात भारताची एक अनोखी ओळख आहे. भारताला ही अनोखी ओळख मिळाली ती येथील संस्कृती आणि पर्यटनातील समृद्धीमुळे. २५ जानेवारीला भारतात राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो. दरवर्षी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भारताला भेट देत असतात. ते भारतातील संस्कृती, सौंदर्य आणि येथील सांस्कृतिक वारशाचे अभ्यास करतात. दरम्यान आजच्या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्ताने आपण घेऊया UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या भारतातील खालील ठिकाणांबद्दलची संक्षिप्त माहिती.
 
१. ताजमहाल, आग्रा :
 
national tourism day 2023 (Image Source : Internet)
 
जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहाल. जगातील सर्वात सुंदर मानवनिर्मित इमारतींपैकी एक असलेले ताजमहाल मुघल स्थापत्य शैलीचे अप्रतिम उदाहरण आहे. ताजमहालाच्या चारही प्रवेशद्वारांवर शिलालेख आहेत. ताजमहाल हे अप्रतिम सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे. तलाव आणि तलावातील कारंजे हे परिसराची शोभा आणखीन वाढविण्यास मदत करतात.
  
२. हंपी, कर्नाटक :
 
national tourism day 2023
 (Image Source : Internet)
 
कर्नाटकातील विजयनगर राज्याच्या अवशेषांमध्ये सांत्वन मिळालेला हंपी समूहाचा स्मारक हा जणू इतिहासाचे साक्षात स्वरूप आहे. येथील द्रविडीयन वास्तुशैली स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांना नक्कीच आकर्षित करणारे आहे. हंपीच्या माटुंगा टेकडीवर बसल्यानंतर दैनंदिन जीवनातील व्यस्तता विसरून मनाला शांततेचा अनुभव मिळतो.
 
३. भारताची माऊंटन ट्रेन:
 
national tourism day 2023
 (Image Source : Internet)
 
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे आणि कालका- शिमला रेल्वेतून प्रवास करताना जमिनीवर स्वर्ग उतरल्याचा अनुभव जणू तुम्हाला मिळेल. या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करताना निसर्गाच्या कुशीत प्रवास करत नयनरम्य नैसर्गिक दृश्य बघणे डोळ्यांना एक सुखद आनंद देणारा ठरतो.
 
४. सूर्य मंदिर, कोणार्क:
 
national tourism day 2023
 (Image Source : Internet)
 
सूर्य देवाला समर्पित ओडिशा येथील सूर्य मंदिर हे अद्वितीय वास्तुशिल्पाचा एक अनोखा उदाहरण आहे. २४ गुंतागुंतीच्या कोरीव चाकांवर उभे असलेले हे मंदिर आपल्या सौंदर्याने कुणालाही आश्चर्यचकित करू शकते. या ठिकाणाची विशेषता म्हणजे, येथे सुर्प्रकाशाच्या स्थितीवरून वेळ सांगता येते. येथे शिल्पकलेच्या तपशिलांमध्ये कलिंग वास्तुकलेचा सर्वात विकसित काळ एक्सप्लोर करता येते.
 
५. राणी की वाव, गुजरात:
 
national tourism day 2023
 (Image Source : Internet)
 
गुजरातमधील पाटण येथील राणी की वाव येथे वास्तुशास्त्रातील उत्कृष्टता आणि अध्यात्माचे परिपूर्ण मिश्रण पाहायला मिळेल. राणी की वाव हे इतके अद्भुत स्थान आहे जे तुम्हाला आश्चर्याचा झटका देऊ शकते. येथील दगडी कोरीव काम, पायऱ्यांची रचना, भगवान शिव ला समर्पित शिल्पे एक भव्य आणि अनोखा अनुभव देतात.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.