वुशू स्पर्धेत प्रवीण वानखेडे यांना सुवर्ण व रौप्य पदक

    24-Jan-2023
Total Views |
- खासदार क्रीडा महोत्सवात खेळाडू सन्मानित

Pravin Wankhede 

नागपूर :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात नुकताच खासदार क्रीडा महोत्सव (Khasdar Krida Mahotsav) पार पडला. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात अनेक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या असून विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना सन्मानितही करण्यात आले. यावेळी वुशू स्पर्धेमध्ये शहरातील प्रतिभावंत खेळाडू प्रवीण वानखेडे यांनी सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले.
 
महावीरनगर मैदान येथे झालेल्या स्पर्धेमध्ये वुशू स्टार अकॅडमीचे प्रवीण वानखेडे यांनी तावलू मधील दोन प्रकारांमध्ये बाजी मारली. तावलू मध्ये ताईचीजीयान प्रकारात सुवर्ण पदक तर ताईचीकॉन प्रकारात रौप्य पदकावर मोहोर उमटविली. माजी नगरसेविका दिव्या धुरडे, स्पर्धेचे समन्वयक अशफाक शेख आदींच्या हस्ते प्रवीण वानखेडे यांना सुवर्ण व रौप्य पदक आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
 
 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.